सर्वात मोठी बातमी!Rahul Gandhi लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे.त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयकडून सोमवारी पडताळून पडताळणी केली. त्यानंतर  खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आता त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केल्यानंतर देशभरामध्ये काँग्रेसचे  कार्यकर्ते जल्लोष करीत आहेत.

 

लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना एक ऑर्डर काढून खासदारकी बहाल केली आहे. या ऑर्डरमध्ये संपूर्ण गोषवारा देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी 24 मार्च रोजी रद्द करण्यात आली होती.त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश आला आहे.त्यामध्ये कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे, असं या नोटिश मध्ये म्हटलं आहे.

 

आजच संसदेत हजर राहणार

राहुल गांधी लोकसभेच्या कामकाजात खासदारकी बहाल झाल्यानंतर आजच कामकाजात भाग घेणार आहेत. सरकार विरुद्धातील अविश्वास यावर उद्या 8 ऑगस्ट रोजी ठराव होणार आहे. हि चर्चा 8 ते 10 ऑगस्ट पर्यंत दिसणार आहे.नंतर 10 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देणार आहेत. त्यामुळे सध्या या चर्चेमध्ये राहुल गांधी सरकारचे वाभाडे काढण्यात असल्याचे सांगितले जात आहे.

 

कोर्टाकडून दिलासा

मोदी सरनेम प्रकरणी सूरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. नंतर  गुजरात उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सूरत न्यायालय आणि गुजरात हायकोर्टाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. यामध्ये सत्र न्यायालयाने सर्वाधिक शिक्षा दिली.त्यामध्ये कोणताही तर्क शिक्षा देण्यामागचा नव्हता.त्यामुळे हि शिक्षा कमीत कमी दिली जाऊ शकली असती, यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली होती.

दरम्यान, राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याचं वृत्त येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष केला. काँग्रेसच्या कार्यालयासमोर ढोल वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

 

JOIN WHATSAPP GROUP  FOLLOW INSTAGRAM ,FOLLOW TWITTER   ,FOLLOW FACEBOOK

 

2 thoughts on “सर्वात मोठी बातमी!Rahul Gandhi लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी”

Leave a Comment