Maharashtra Goverment | मोठी बातमी! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, मंत्रिमंडळाचा निर्णय

Maharashtra Goverment : राज्य सरकारांनी राज्यातील नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. गरीब ,गरजू रुग्णांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार करण्यासंदर्भात निर्णय हा या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे . भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 नुसार Right to Health  चा नागरिकांना अधिकार आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. दरम्यान या निर्णयामुळे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

 

जिल्हा सामान्य रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय संदर्भ सेवा रुग्णालय (Super Specialty Hospital- नाशिक आणि अमरावती), तसेच कॅन्सर हॉस्पिटल या सर्व ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत. राज्यातील(Maharashtra Goverment) या सर्व रुग्णालयात वर्षभरामध्ये उपचार घेण्यासाठी 2.55 कोटी नागरिक येतात.

Leave a Comment