Maharashtra New District List | महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती स्थगित का? राजस्थानमध्ये जिल्ह्यांची पन्नाशी…

Maharashtra New District List : महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन कधी होणार ? असा प्रश्न निर्माण होतंय कि , कारण आता राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून तब्बल पन्नास जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यांचे विभाजन करण्यासाठी समितीला अहवाल करून दहा वर्ष पूर्ण झाले आहेत.तरी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता जिल्हा विभाजनाला खिळ बसवलेली दिसत आहे.

महाराष्ट्र मध्ये वेळोवेळी मागणी करून सुद्धा 36 चं जिल्हे आहेत. यामध्ये 25 जिल्ह्याचे विभाजन करून 67 नवीन जिल्हे करण्याची मागणी वेळोवेळी होताना पाहायला मिळते. देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे राजस्थान आणि मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्र हे तिसरे मोठे राज्य आहे. त्यात राजस्थान मध्ये 50 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि मध्यप्रदेश मध्ये 52 जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे.

महाराष्ट्र मधील काही जिल्हे क्षेत्रफळानुसार मोठे असल्यामुळे विकास होत नाही असे मुद्धे अनेक वेळेस समोर आलेले पाहायला मिळतंय.यावर निर्णय घेण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसुल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापना जुलै 2014 मध्ये करण्यात आलेली होती. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. नंतर याच समितीद्वारे नोव्हेंबर 2016 ला सरकारला अहवाल  सादर करण्यात आला होत. परंतु वित्त विभागाच्या अभिप्राय नंतरही हा निर्णय आता तसाच लांबणीवर पडलेला दिसत आहे.

 

वित्त विभागाचा अभिप्राय काय आहे?

नवीन जिल्हा निर्मिती करण्यासाठी राज्यामध्ये त्या परिस्थिती मध्ये हजार कोटींचा आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होऊ  शकतो. तसेच नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण ठरविल्यास समाज घटकांकडून ही मोठ्या प्रमाणात मागण्या प्राप्त होऊ शकतात.नंतर हे धोरण ठरवल्यास आदेश मिळवून घेण्यासाठी न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे सध्या नवीन धोरण ना ठरविता सन 2021 च्या जनगणनेच्या आधारे निकष निश्चित करणेयोग्य ठरेल.असा अभिप्राय वित्त विभागाने या समितीच्या अहवालावरती दिलेला पाहायला मिळतोय. अजूनही मात्र यावर  कुठल्या प्रकारची हालचाल झालेली पाहायला मिळत नाही. 

 

राज्यात कोणकोणत्या नवीन जिल्हेची मागणी आहे?

Maharashtra New District List:

जिल्हा  प्रस्तावित नवीन जिल्हे 
बीड अंबेजोगाई
यवतमाळ पुसद
अमरावती अचलपूर
बुलडाणा खामगाव
भंडारा साकोली
चंद्रपूर चिमूर
गडचिरोली अहेरी
जळगाव भुसावळ
लातूर उदगीर
नांदेड किनवट
अहमदनगर शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
नाशिक मालेगाव,कळवण
सातारा मानदेश
पुणे बारामती/शिवनेरी
पालघर जव्हार
ठाणे मीरा भाईंदर, कल्याण
रत्नागिरी मानगड
रायगड महाड

 

महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन जिल्हा निर्मिती मध्ये 25 जिल्ह्यांचे विभाजन करून 67 जिल्हेची निर्मिती करावी लागेल. हि मागणी आहे. यासाठी 56 कार्यालय तयार करावी लागतील. काही दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. पण अजून पालघर जिल्ह्यात सर्व कार्यालाय सुरु झाली नाहीत.

सध्या नवीन जिल्ह्याचा निर्णय तात्काळ होऊ शकत नाही, त्यामुळे काही ठिकाणी फक्त प्रशासकीय कार्यालय सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये बीडमध्ये आंबेजोगाई, नाशिकमध्ये मालेगाव,गडचिरोलीमध्ये आहेरी आणि  पालघरमध्ये जव्हार अशी प्रशासकीय कार्यालये तयार करण्यात आलेली आहेत.मात्र ,नवीन जिल्हा निर्मितीसाठी हजारो कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये सध्या तरी नविन जिल्हा निर्मितीच्या फाईल धुळखात मंत्रालयामध्ये पडलेली पाहायला मिळते. 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update