Sharad Pawar : आज अचानक साथ सोडली, शरद पवारांकडून आज हल्लाबोल? छगन भुजबळ 1999 पासून शरद पवारांसोबत?

Sharad Pawar : छगन भुजबळांचा मतदारसंघ का निवडला शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावरून सध्या जोरात चर्चा चालू आहेत .

Sharad Pawar vs Chagan Bhujbal:

शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील ( Maharashtra NCP)फुटी नंतर सभा  होत आहे .राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गट पडून ज्यांनी ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यांच्या मतदारसंघात  जाऊन शरद पवार जनतेशी आव्हान करणार आहेत .शरद पवारांच्या सभेला येवल्यातून आज सुरवात होत आहे .

 

राजकीय प्रवासाची दिशा बदलामुळे आठ दिवस आधी एकाच सत्कार सभारंभात सामील होणारे नेते आज एकाच मार्गावरून दोघे पण आज नाशिक ला जात असले तरी दोघांच्या वेळे मध्ये फरक आहे .एकीकडे राष्ट्रवादी पक्षामधून पवारांची साध सोडून अजित पवारांच्या गटात सामील राष्ट्रवादीची  मुलुख तोफ छगन भुजबळ आणि एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार .दोघेही हि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी नाशिकला आले आहेत .काही दिवसापूर्वी मंडल आयोगाच्या मुद्यावरून शिवसेनेला रामराम करणारे ,विदेशीच्या मुद्यांवरून सोनिया गांधी याना सोडून नंतर शरद पवारसोबत काँगेसचा हात सोडून पवारांची साथ देणारे आणि आता पवारांचीही साथ सोडून अजित दादांच्या गटात सहभागी होणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या राजकीय प्रवासातील हे दुसरे राजकीय बंड आहे. 

1999 शरद पवार यांच्या जवळ असणारे प्रदेशाध्यक्ष पद , गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असे महत्वाचे पद उपभोगणारे, अडीच वर्षे तुरूंगाची हवा खाल्ल्यानंतर ही शरद पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिले, तरीही भुजबळ यांनी ओबीसीचा मुद्दा पुढे करून पवारांची साथ सोडल्याने त्यांच्याच मतदारसंघात जाऊन भुजबळांना अस्मान दाखविण्याची रणनीती पवार गटाकडून आखण्यात आली आहे. भुजबळ वक्ते आहेत, सभा गाजविण्याचे कसब त्यांच्यात आहे.  सलग चार टर्म पासून येवल्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने अजित दादांना भक्कम साथ देण्याऱ्या नेत्यालाच हादरा दिल्याने इतरांपर्यंतही पवारांच्या आक्रमकतेचा संदेश पोहचविण्याची त्याच्यावर हल्लाबोल करण्याची चाल पवारांनी खेळली आहे.

नाशिक करांची शरद पवारांना साध

शरद पवार यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केले आहे, पुलोद पासून नाशिक जिल्हा पवारांच्या सोबत उभा राहिला आहे. त्यामुळे नव्या इनिंगची सुरवात करण्यासाठी त्यांनी बारामती, म्हाडा नव्हे तर नाशिकला पसंती दिली असून नाशिककरांना साद घातली आहे. पवारांच्याच मुशीत तयार झालेल्या रोहित पवारांनीही अजित पवार गटात सहभागी झालेल्यावर हल्ला करत पवार गटाचे इरादे स्पष्ट केलेत. ठाकरे गटानेही भुजबळांच्या विरोधात दंड थोपटले असून पवारांच्या सभेला रसद पुरवत पाठबळ दिले आहे

नाशिकचे बाहुबली आपणच … 

एकीकडे पवारांचा झंझावात सुरू झाला असताना, दुसरीकडे पवारांच्या दौऱ्याचे महत्व कमी करण्यासाठी आणि नाशिकचे बाहुबली आपणच आहोत. हे दाखवून देण्यासाठी छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे येण्याचा आजचाच मुहूर्त शोधला. पवार साहेबांचे आपल्यावर प्रेम असल्याने ते येवल्यात सभा घेत आल्याची खोचक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. छगन भुजबळ राज्यातील वरिष्ठ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत.   भुजबळ जेव्हा जेव्हा अडचणीत येतात, नवा मार्ग निवडतात किंवा संघर्षाला उतरतात. तेव्हा तेव्हा ओबीसींची मोठी ताकद त्यांच्या सोबत उभी राहते. आजही नाशिकच्या रस्त्यावर तेच दृश्य होते. त्यामुळे आजची गर्दी आणि दोन्ही गटाचे शक्ती प्रदर्शन मतात परावर्तित होते का? हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल, तोपर्यंत हल्ले, प्रतिहल्ले, आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच राहणार आहे.

2 thoughts on “Sharad Pawar : आज अचानक साथ सोडली, शरद पवारांकडून आज हल्लाबोल? छगन भुजबळ 1999 पासून शरद पवारांसोबत?”

Leave a Comment