Maharashtra Political Ncp Crisis: महाराष्ट्रला नवा उपमुख्यामंत्री मिळाला 2023 ,अजित पवारांच्या बंडामुळे 2024 पूर्वी भाजपसाठी ‘गूड न्यूज’

Maharashtra ncp political crisis: अजित पवार सध्याचा सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री झाले आहेत .2024 लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्भवलेल्या राज्याच्या राजकारणातील नव्या समिकरणांमुळे भाजपला कितपत फायदा होणार?

Maharashtra Ncp Politics Crisis
Maharashtra Ncp politics crisis 2023

 

राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार  (Ajit Pawar) हे रविवारी (2 जुलै) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy CM) झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या  काही अमादारांना सोबत घेऊन बंड केल्याचे शरद पवार यांनी मान्य केले . अजित पवार यांनी (2 जुलै) राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली .अजित पवार सोबत 08 आमदारांनी मंत्रिपदाची  शपथ घेतली .अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षावर दावा केला होता. तसेच पक्षातील वरिष्ठाच्या आशीर्वादानेच आम्ही सरकारमध्ये सामील झाल्याचे अजित पवार म्हणाले . त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पाली भूमिका स्पष्ट केली .यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांनी बंड केल्याचे मान्य केले .

तसेच सहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक चर्चा बोलावली होती .पण त्याआधीच काही जणांनी वेगळी भूमिका घेतली . कुणीही पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार आहे .आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ते आहेत ,असे शरद पवार म्हणाले . यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर  निशाणा साधला .तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर भ्रष्ठाचाराचा आरोप केला होता .त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री केले. भाजपने राष्ट्रवादीच्या भ्रष्टचाराच्या आरोपातून मुक्त केले ,असे शरद पवार म्हणाले .

 

विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्याचे आता समजले , असे शरद पवार म्हणाले ,राष्ट्रवादीचे बडे नेते सोडून गेले याची चिंता नाही ,त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते .अजित पवार सोबत गेलेले काही सहकारी संपर्कात आहेत ,असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले .तसेच आजचा प्रकार माझयासाठी नवा नाही .जे घडले त्यामुळे मी चिंतेत नाही.याआधी ही 1980 साली असा प्रकार घडला होता . मी फक्त काही जणांचाच नेता होतो .पक्ष पुन्हा बांधला होता .त्यावेळेस पक्ष सोडून गेलेले चा पराभूत झाला होता .असे म्हणत पुन्हा पक्ष बांधणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले .

Maharashtra Politics Crisis
Maharashtra Ncp Politics Crisis

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्धे ….

 

ईडीच्या चोकशीमुळे काही आमदार अस्वस्थता होती  .मोदीच्या वकृत्वानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.

देशातील सर्व महत्वाच्या नेत्याचे फोने आले .उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली .

शपथविधी सभारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते .

पक्ष फूडला असो मी कधीच म्हणणार नाही

आम्ही न्यालयात जाणार नाही ,जनतेत जाणार आहोत .

तटकरे ,प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाही करणार

राष्ट्रवादी सोडून गेलेले नेत्यांची राजकीय भविष्याची काळजी

महाविकास आगाडी एकत्र काम करणार .

जे घडले त्याची चिंता नाही .

 

2 thoughts on “Maharashtra Political Ncp Crisis: महाराष्ट्रला नवा उपमुख्यामंत्री मिळाला 2023 ,अजित पवारांच्या बंडामुळे 2024 पूर्वी भाजपसाठी ‘गूड न्यूज’”

Leave a Comment