सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; रुग्णसंख्या तब्बल 1 लाख 87 हजारांवर

Maharastra News : महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ऑगस्टपर्यंत 1 लाख 87 हजार रुग्ण आढळले आहेत. राज्यामध्ये अनेक भागांत डोळ्यांच्या साथीचे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रुग्णची सर्वाधिक संख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर जळगाव, अमरावती आणि पुण्यात प्रमाण जास्त आहे.आरोग्य विभागाकडून डोळे येण्याची साथ वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जास्त रुग्णंसख्या आढळलेल्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत.

 

डोळे येण्याची मुंबईतील रुग्णसंख्या १ हजार ३१७ आहे.तसेच सर्वाधिक डोळे येणाचे प्रमाण 30 हजार 592 रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले.त्या पाटोपाट जळगाव जिल्ह्यामध्ये 12 हजार 139 , अमरावती मध्ये 10 हजार 710,पुणे 10 हजार 531,अकोला 10 हजार 132 अशी रुग्णसंख्या आहे. पुणे महापालिकाच्या  हद्दीत 1 हजार 195 रुग्णांची नोंद झाली आहे,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 3 हजार 551 रुग्ण सापडले. 

 

एंटेरो विषाणूमुळे साथ:

पुणे  जिल्ह्यातील आळंदी परिसरात मागील महिन्यात डोळ्यांच्या साथीचे चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते.त्यानंतर जिल्हा परिषदेने त्या परिसरातील शाळांमध्ये मुलांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. त्यांची तपासणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. या वेळी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (एनआयव्ही) रुग्णांचे नमुने गोळा केले होते. या अहवालामध्ये एंटेरो विषाणूमुळे ही साथ पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

 

डोळे येण्याची लक्षणे:

  • डोळ्याला सूज येणे
  •  वारंवार पाणी येणे
  • डोळे लाल होणे

 

अशी घ्या काळजी…

  • परिसर स्वच्छता ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे
  • डोळे आलेल्या व्यक्तीचे घरातच विलगीकरण
  • डोळ्यांना हात न लावणे
  • वारंवार हात धुणे
  • वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
  • वारंवार हात धुणे

 

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून डोळ्यांच्या साथी सुरू असलेल्या भागात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. त्याचबरोबर त्या  भागातील शाळांमध्ये मुलांची तपासणीही केली जात आहे. उपचारासाठी या साथीवरील आवश्यक असलेली औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत…-डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्यसेवा

 

 

JOIN WHATSAPP GROUP FOLLOW INSTAGRAM ,FOLLOW TWITTER , FOLLOW FACEBOOK

2 thoughts on “सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; रुग्णसंख्या तब्बल 1 लाख 87 हजारांवर”

Leave a Comment