Mahila Samman Savings Certificate Yojana 2023 : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू; एकदाच गुंतवणूक अन् 2 वर्षात 2 लाख 32 हजारापर्यंत फायदा, असा घ्या लाभ..!

Mahila Samman Savings Certificate Yojana 2023 :वित्त मंत्रालयाने वर्ष 2023 साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात ‘आझादी का अमृत महोत्सव‘ च्या स्मरणार्थ या योजनेची घोषणा केली होती. मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसह आणि दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह तसेच आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायांसह तिमाही चक्रवाढ पद्धतीने 7.5 टक्के दराने आकर्षक आणि निश्चित व्याज देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.

 

Mahila Samman Savings Certificate Yojana 2023
                                               Mahila Samman Savings Certificate Yojana 2023

 

मोदी सरकारची महिलांसाठी नवी बचत योजना :

राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) योजना, 2019 मध्ये राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि एका खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा चार लाख पन्नास हजार रुपयांवरून नऊ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे आणि 1 एप्रिल 2023 पासून संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2019 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि गुंतवणूकीची कमाल मर्यादा आजपासून 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

बचत ठेव आणि पीपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निधी (PPF) वगळता सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून सुधारणा करण्यात आली आहे. या उपायांमुळे टपाल खात्यामधल्या लहान बचत करणाऱ्या ग्राहकांना खूप फायदा होईल आणि टपाल कार्यालयाद्वारे या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करता येईल, विशेषतः ग्रामीण भागात आणि मुली, महिला, शेतकरी, कारागीर, ज्येष्ठ नागरिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी, छोटे व्यापारी आणि समाजातील इतर घटक यांना लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.

 

Mahila Samman Savings Certificate Yojana 2023 (महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना) :

१ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली होती ती महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे. या योजनेवर ७.५% दराने व्याज मिळते.

महिला सन्मान बचत पत्र म्हणजे MSSC योजने अंतर्गत २०२५ पर्यंत किंवा २ वर्षांसाठी असून या बचत योजनेत ७.५ टक्के व्याज दिला जाईल. महिला किंवा तुमच्या मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते

 

 

नफा किती होईल?

[expander_maker id=”1″ more=”Read more” less=”Read less”]महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा २ लाख रुपये आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला ७.५% निश्चित व्याज दराने परतावा म्हणजे या योजनेत तुम्हाला एका वर्षात १५,४२७ रुपयांचा परतावा मिळेल. तर दोन वर्षांत ३२,०४४ रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे, या योजनेतील तुमची दोन लाख रुपयांची गुंतवणूक दोन वर्षांत २.३२ लाख रुपये होईल.

तुम्ही या योजनेत गुंतवलेली राशी रक्कम काढू (withdraw) शकता. पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत भौतिक MSCC पावती मिळवण्यासाठी तुम्हाला ४० रुपये तर तुम्ही ऑनलाइन पावती घेतली तर तुम्हाला ९ रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, १०० रुपये टर्नओव्हर पेमेंटसाठी आकारले जातील.

 

एमएसएससी खाते कोठे उघडता येईल?

तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन MSSC खाते उघडू शकता. MSSC खाते उघडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

 

👉 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (GR) शासन निर्णय PDF डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

 

📌अधिकृत वेबसाईट – अधिक माहितीसाठी कृपया www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

 

कृपया हि माहिती सर्वाना पाठवावी ,जेणे करून प्रत्येकजणाला या योजनेचा लाभ घेता येईल .अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे.

 

हे सुद्धा वाचा

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023 :केंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज !

 

[/expander_maker]

3 thoughts on “Mahila Samman Savings Certificate Yojana 2023 : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू; एकदाच गुंतवणूक अन् 2 वर्षात 2 लाख 32 हजारापर्यंत फायदा, असा घ्या लाभ..!”

Leave a Comment