Marathwada Mukti Sangram Din 2023 : भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 13 महिने मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नाही, मराठवाड्यावर अन्याय झाला का?

Marathwada Mukti Sangram Din 2023 : (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2023) मराठवाडा स्वतंत्र होऊन 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षे पूर्ण होऊन 76 वर्षात प्रवेश करेल.दक्षिणगंगा गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याने स्वभावात, स्वरुपात एक वेगळी चव असणारी इथली माती आणि माणसं ! छत्रपती शिवरायांच्या पुर्वजांची साक्ष देणारी भुमी. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर, वैद्यनाथ, नागनाथ अशी ज्योतिर्लिंग विराजमान असणारी भुमी प्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेणी, गुंफा, मंदिरे, अनेक संतांचे, पंथाचे, राजवटींचे, धर्मियांचे आश्रयस्थान असणारी भुमी. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी भुमी. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव आणि निजाम अशा वेगवेगळ्या राजवटी पाहणारी भुमी. आजच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्या भुमीला मराठवाडा म्हणुन ओळखले जाते.

औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतरच्या धामधुमीत सय्यद हुसेन अलीने मराठ्यांच्या मदतीने १७२० ला दिल्ली हस्तगत केली आणि निजामाला दक्षिणेचा सुभेदार नेमले. हैद्राबादला निजामाने स्वतंत्र राज्य घोषित केले. तेव्हापासुन हैद्राबादवर निजामाचा अंमल सुरु झाला. १९११ ला सत्तेवर आलेल्या शेवटचा निजाम मीर उस्मान अलीने पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना मदत केली. हैद्राबादला स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरु झाली. त्याने फारशीला राज्यभाषा केले. उर्दु ही शिक्षणाची भाषा केली. नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना प्रमाणापेक्षा जास्त लाभ दिला. यामुळे मराठवाड्यातील लोकांवर चारी दिशांनी सांस्कृतिक, सामाजिक आक्रमण व्हायला लागले. तिथुन मराठवाड्यात सामाजिक,आक्रमण व्हायला लागले. तिथुन मराठवाड्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जागृती सुरु झाली. त्यातुनच वेगवेगळ्या संस्था, व्यक्तिमत्त्व, साहित्य उदयाला आले.

1838 ते 1948 हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा (Marathwada Mukti Sangram Din) प्रमुख कालखंड म्हणुन ओळखला जातो. वेगवेगळ्या राजकिय, विद्यार्थी चळवळी, जनआंदोलने आणि सशस्त्र आंदोलने या काळात झाली. ही सगळी आंदोलने व विरोध मोडुन काढण्यासाठी निजामाने कासीम रझवी याच्या माध्यमातुन रझाकार संघटनेची वाढ केली. त्यांचा वापर करुन संस्थानात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा निजामाने प्रयत्न केला. आपले राज्य टिकवण्यासाठी त्याने अन्यायी मार्गाचा अवलंब केला. दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघडउघड आव्हान म्हणुन ७ ऑगस्टला भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन केले गेले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणुन काढण्यास सुरुवात झाली. निजाम सत्तेला शरणागती पत्करावी लागली. परंतु मानहानीमुळे चिडलेल्या निजामाने दुसऱ्या बाजुने रझाकरांच्या माध्यमातुन अत्याचार आणि रक्तपात सुरु केला.

७ सप्टेंबरला वल्लभभाई पटेलांनी आपल्या सैन्यदलाला हैद्राबादवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु झाले. 17 सप्टेंबर 1948 ला निजामाने माघार घेतली आणि मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला.तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) म्हणून साजरा केला जातो. हैद्राबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले. तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीचाही डाव उधळुन लावला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी जनरेटा निर्माण करण्यात मराठवाड्याचा मोठा वाटा होता. त्यानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

Marathwada Mukti Sangram Din 2023
_Marathwada Mukti Sangram Din 2023

 

मराठवाडा शैक्षणिक दृष्ट्या मागे का राहिला? (Marathwada Mukti Sangram Din)

१९०३ मध्ये सीपी ऐंड बेरारच्या विभाजना नंतर देशातील इतर भागासारखी मराठवाड्याची शैक्षणिक प्रगती झाली नाही. साम्राज्य विस्तारक आणि आधुनिक जगाच्या विकासाची ओळख करुन देणाऱ्या ब्रिटीशांनी मराठवाडा वगळून भारत भर मिशनरीज शाळा सुरु केल्या. इंग्रजी सारखी जगाची ओळख करुन देणारी भाषा अवगत करुन दिली. तो अनुशेष 1948 नंतर अनेक प्रागतीक विचारांच्या लोकांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश आलं. मराठवाड्याच्या शाश्वत विकासाची स्वप्नं पाहणारीही एक पिढी आता तयार होत आहे. त्या पिढीच्या हातुन मराठवाड्याच्या समृद्धीचं काम व्हायला सुरुवात झाली आहे.

मराठवाडा हे नाव कसे पडले? | How did Marathwada get its name?

सम्राट अशोकाच्या 16 राज्यांपैकी दोन राज्य म्हणजेच एक अश्मक आणि दुसरी मुलक ही गोदावरीच्या खोऱ्यात नांदणारी राज्य होती. या दोन्ही राज्यात बहुतांश लोक प्राकृत भाषा बोलणारी सातवाहन राजा हाल यांनी 700 गाथा एकत्र करून गायक सप्तशती म्हणजेच ‘गाथा सप्तशती’ हा ग्रंथ संपादित केला याची भाषा प्राकृत होती. यामध्ये गोदावरी खोऱ्यातील लोकांचे जीवन प्रतिबिंबित झाले आहे यातून एकच निदर्शनास येते की, हा प्रदेश म्हणजेच मराठीचे आद्य रूप म्हणजेच महाराष्ट्र प्राकृत बोलणारा प्रदेश होता पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली. नंतर 1724 मध्ये दिल्लीचा सुभेदार निजामपूर मुल्क या निजामशहाने हैदराबाद मध्ये निजामशाही स्थापन केली. यामध्ये तीन भाषा बोलणारे प्रदेश होते एक तेलगू म्हणजेच आंध्र, कर्नाटक भाषकांचा कर्नाटक आणि मराठी भाषा बोलणाऱ्यांचा मराठवाडा यामधील लातूर म्हणजे आधीचा उस्मानाबाद जिल्हा मराठी बोलणारे लोकांचा शेवटचा भाग म्हणजे निजामाचा काळात भाषेप्रमाणे प्रदेशाची नावे ठेवली गेली आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा मराठवाडा हे नाव कायम झाले. याच मराठवाड्याचा 75 वा स्वातंत्र्यदिन आपण 17 सप्टेंबर 2023 ला “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” (Marathwada Mukti Sangram Din 2023) साजरा करणार आहोत.

Marathwada Mukti Sangram Din 2023
_Marathwada Mukti Sangram Din 2023

 

मराठवाड्यात निजाम कसे आले ? | How did the Nizam come to Marathwada?

निजाम-उल-मुल्क चा कालखंड हा निजामशाहीचा उदयाचा होता. या कालखंडात मराठ्यांशी कधी मैत्री तर कधी तह करून कधी माफी मागून निजामशाही टिकून राहिली. इसवी सन 1724 ते 1748 अशी 24 वर्षांची ही कारकीर्द होती त्यानंतर निजामाच्या वारसदारांना इसवी सन 1748 ते 1762 पर्यंत वारसा युद्ध घडून आले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम आली हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्याने स्वतःच निजाम अशी पदवी धारण केली म्हणून नंतरच्या सर्व राजांना निजाम असे संबोधण्यात येते. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटाकडून “आसफजाह” असा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याचा उल्लेख जहा घराणे असाही करण्यात येतो निजामशाही ने सुरुवातीपासूनच बलदंड सत्तेबरोबर दोस्ती करून किंवा त्यांच्यापुढे नमते घेऊन आपले राज्य केल्याचे दिसून येते. 18 व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात ब्रिटिशांचा दबदबा वाढायला लागला होता हेरूनच निजाम अली यांनी ईस्ट इंडिया कंपनी बरोबर 12 ऑक्टोंबर 1860 मध्ये तैनाती फौजेचा करार केला या कराराद्वारे संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबाद कायम झाली या कारणामुळे निजामाने हिंदुस्थानातील कोणत्याही राजाबरोबर कसलाही संबंध ठेवणार नाही हे मान्य केले. कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने इंग्रजांना फौजेच्या खर्चासाठी ईस्ट इंडिया कंपनीला दिले या करारामुळे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत बंडखोरांशी पूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी कंपनीने स्वतःवर घेतली. या करारातून हैदराबादचे निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. निजाम अली नंतर निजाम सिकंदर शहा, नासर दौला, अब्जुत दौला, मेहबूब अली खान यांनी हैदराबाद संस्थानावर राज्य केले आणि हळूहळू मराठवाड्याच्या या भूमीमध्ये आणि एकूणच हैदराबाद संस्थानात निजाम स्थिरस्थावर झाले.

Marathwada Mukti Sangram Din 2023
_Marathwada Mukti Sangram Din 2023

 

उद्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या (Marathwada Mukti Sangram Din 2023) निमित्ताने मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन..

हा लेख तुम्हाला कसा वाटलं ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.अश्याच प्रकारे चालू घडामोडी व अचूक माहितीसाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला आवशयक जॉईन व्हा.

Leave a Comment