Mera Bill Mera Adhikaar Scheme! अन् 1 कोटी जिंका, 1सप्टेंबरपासून जबरदस्त योजना होणार सुरू

Mera Bill Mera Adhikaar: वस्तू आणि सेवा करावर, सरकारला बनावट बिलं आणि बनावट नोंदणींबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनीही गेल्या काही महिन्यांत याविरोधात मोहीम सुरू केली आहे. आता बनावट बिलांना आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांना जागरूक करण्यासाठी, सरकार एक नवीन रिवॉर्ड योजना (GST Reward Scheme) सुरू केली आहे, ज्या माध्यमातून तुम्ही एकाच बिलाद्वारे लाखोंची बक्षिसे जिंकू शकता.

नेमके काय आहे योजना?

सरकारने 1 सप्टेंबरपासून सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘मेरा बिल मेरा अधिकार प्रोत्साहन योजना’ सुरू करणार आहे. याच्या मोबाइल ॲपवर ‘बिल’ अपलोड करून, लोक 10.000 रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंतची रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा उद्देश लोकांना प्रत्येक वेळी खरेदी करताना बिलं मागण्यास प्रवृत्त करणे हा असल्याची माहिती, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळान सांगितलं.

ही योजना सध्या आसाम, गुजरात आणि हरियाणा, पुडुचेरी, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू केली जाणार आहे. जीएसटी बिल अपलोड केल्यानंतर लोकांना रोख रक्कम लगेच मिळू शकते. अशी माहिती सीबीआय सीना सोशल मीडिया ट्विटर वर ही माहिती दिली आहे.

या गोष्टींची काळजी घ्या.

“Mera Bill Mera Adhikaar”हे अप ios जाणि Android दोन्ही वर उपलब्ध आहे त्यावर माहिती अपलोड करताना इनव्हॉईसमध्ये विक्रेत्याचा GSTIN, इनव्हॉइस नंबर, भरलेली रक्कमची माहिती असणं अनिवार्य आहे. बिलाचे किमान मूल्य 200 रुपये असणं अनिवार्य आहे.

हेही वाचा 

भारताची INDIA UPI तंत्रज्ञानाची जगाला भुरळ, जाणून घ्या ते कसे आणि कधी सुरू झाले

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “Mera Bill Mera Adhikaar Scheme! अन् 1 कोटी जिंका, 1सप्टेंबरपासून जबरदस्त योजना होणार सुरू”

Leave a Comment