मोदी आणि पवार उद्या एकत्र येतायत तो पुरस्कार काय आहे?वाचा सविस्तर

मोदी आणि पवार :  उद्या लोकमान्य टिळकांची 103 वी पुण्यतिथी आहे .या निमित्तने   मोदींना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या  वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येणार आहे,पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात हा कार्यक्रम पडणार आहे . त्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी,शरद पवार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे सर्वपक्षीय नेते एकाच ठिकाणी दिसणार ,  राष्ट्रवादी बंडानंतर दोन्ही पवारांनी एकाच  स्टेज शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. यावेळेस  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार सुद्धा एकत्र येणार आहेत. तर आता मोदी आणि पवार उद्या एकत्र येतात तो पुरस्कार नेमका काय आहे?. हा टिळक पुरस्कार कोणाकडून दिला जातोय मोदींना हा पुरस्कार देण्यामागचे कारण काय आतापर्यंत कोणाकोणाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. याची संपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ ..

 

देशाच्या इतिहासात लोकमान्य टिळकाचे  महत्व त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेलं योगदान आपण जाणून आहोतच त्यांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांची आठवण म्हणून दरवर्षी एक ऑगस्टला टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या  वतीने देशहितासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या  ट्रस्टवर सध्या दीपक टिळक ,रोहित टिळक, गीताली टिळक, प्रणिती टिळक, रामचंद्र नाम जोशी, सरिता साठे, सुशीलकुमार शिंदे हे ट्रस्टीज आहेत.  दीपक टिळक हे या ट्रस्टचे  अध्यक्ष आहेत .त्यांच्याच हस्ते हा पुरस्कार मोदींना देण्यात येणार आहे . एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असतं. तर या पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून सुरू करण्यात आला आहे .

 

१९८३ साली पहिला पुरस्कार देण्यात आला होता. तो ज्येष्ठ समाजवादी नेते  एस एम जोशी याना यांच्या सहित 40 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 1. गोदावरी परुळेकर
 2. इंदिरा गांधी
 3. श्रीपाद अमृत डांगे
 4. अच्युतराव पटवर्धन
 5. खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर)
 6. सुधाताई जोशी
 7. मधु लिमये
 8. बाळासाहेब देवरस
 9. पांडुरंग शास्त्री आठवले
 10. शंकर दयाळ शर्मा
 11. अटल बिहारी वाजपेयी
 12. टी .एन .शेषन
 13. डॉ. रा.ना .दांडेकर
 14. डॉ. मनमोहन सिंग
 15. डॉ.आर चिदम्बरम
 16. डॉ विजय भटकर
 17. राहुल बजाज
 18. एम एस स्वामीनाथन
 19. डॉ. वर्गीस कुरियन
 20. रामोजी राव
 21. एन आर नारायण मूर्ती
 22. सॅम पित्रोदा
 23. जी. माधवन नायर
 24. डॉ.ए.सिवाथानू पिल्लई
 25. मॉन्टेकसिंग अहलुवालिया
 26.  प्रणव मुखर्जी
 27. शीला दीक्षित
 28. डॉ कोटा हरिनारायण
 29. डॉ. विकास आमटे
 30.  डॉ. प्रकाश आमटे
 31. डॉ.ई.श्रीधरन
 32. डॉ.अविनाश चंदेर
 33. सुबय्या अरुणन
 34.  शरद पवार
 35. आचार्य बाळकृष्ण
 36. डॉ. के.सिवन 
 37. बाबा कल्याणी
 38. सोनम वांगचुक
 39. डॉ.सायरस पूनावाला
 40. डॉ. टेस्टी थॉमस

 

या दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे .आणि त्यात आता पंतप्रधान  नरेंद्र मोदी याना  हा पुरस्कार जाहीर झालाय हा पुरस्कार पटकावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 41 वे दिग्गज ठरले. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान पदावर असताना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत .तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करावा लागला होता .डॉ मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांना ते पंतप्रधान होण्यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

 

नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यामागे नेमकी कारण काय आहे?

तर यावर लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष  डॉ. रोहित टिळक यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्री स्वदेशी हा महत्त्वाचा भाग आहे तसंच आत्मनिर्भर भारत या संकल्प स्वदेशी उद्योगांच्या प्रगतीला दिशा दिली. आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्णता ही काळाची गरज होती. भारत आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदी सरकारने विविध सुविधा केल्या .यातून  उद्योजक व्यावसायिकांना व्यवसाय करणं सोपं झालं .त्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळाली आहे, तसेच देशवासियांमध्ये मोदींनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून  देशाला जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले, त्यामुळे पंतप्रधान मोदींची या पुरस्कारासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी एकमताने निवड केली असल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना यावेळचा पुरस्कार देताना शरद पवारांची मध्यस्थी कामी आल्याचेही सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीना  पुरस्कार सोहळ्याचा आमंत्रण देताना ट्रस्टच्या विश्वस्तांना अडचण येत होती. विश्वस्तांना मोदींशी संपर्क साधता येत नव्हता काही अडचणी येत होत्या त्यावेळी मोदींना आमंत्रण कसं द्यायचं या पेचा ट्रस्टचे विश्वस्त पडले होते, विश्वस्त रोहित टिळकांनी शरद पवारांची भेट घेतली.यंदाचा  माननीय टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदींना द्यायचा आहे आणि मोदींना फोन लावून कार्यक्रमाचं आमंत्रण द्यावं अशी विनंती  रोहित टिळकांनी शरद पवारांकडे लावून धरली.त्यावेळीस शरद पवार यांनी  थेट मोदींना फोन लावला  आणि त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले . विशेष म्हणजे त्या आधी 27 जून ला भोपाळ मधल्या सभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता . मोदींच्या आरोपानंतर ही त्यांना पुरस्कार सोहळ्याचा आमंत्रण देण्यासाठी फोन लावला होता तर मोदींनी  पुरस्कार सोहळ्याचा आमंत्रण सिविकारलं आणि उद्या ते  या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवारांना निमंत्रित करण्यात आले आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माननीय टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यावरून विरोध का होतंय?

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीची  मूल्य पायदळी तुडवत आहेत असा आरोप करत मोदींना पुरस्कार देण्यावरून काँग्रेस सेवादल आणि इंटक या काँग्रेसच्या संलग्न संघटनांनी विरोध केलाय, तसच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने  मोदींच्या  पुरस्कार ला विरोध केलंय.लोकमान्य टिळक चा इतिहास  स्वातंत्र्य काळाच्या अगोदर पासून हा काँग्रेसचा विचारसरणीशी जोडलेला आहे.  त्याच्यानंतर टिळक घराण्याला काँग्रेसमध्ये अनेक पदे मिळाली आहेत . लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्थ स्वर्गीय जयंतराव टिळक अनेक वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये विधानपरिषदेचे सदस्य होते.टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक हे काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहे .त्यांना संघटनेत स्थान दिलं कसब्याची उमेदवारीही दिली आता एकीकडे त्यांचे नेते राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही लोकशाही विरोधी विचारणा विरोध करतात. देशात आणि परदेशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हे लोकशाही विरोधी हे  कृत्य करतात असा आरोप करतात. आणि असं सगळं असताना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून मोदींना हा पुरस्कार देण्याची योजना आखली केली.त्याचा रोष  स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.असो पण आता उद्या हा मोठा सोळा पार पडणार असून  या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

 

बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चालू घडामोडी ,बातम्या ,बिसनेस,मनोरंजन ,लाइफस्टाइल अश्या बातम्या ऐकण्यासाठी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हायला विसरू नका .

1 thought on “मोदी आणि पवार उद्या एकत्र येतायत तो पुरस्कार काय आहे?वाचा सविस्तर”

Leave a Comment