नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेची अंमलबजावणी कधीपासून; शेतकऱ्यांना या योजण्याचा पहिला हप्ता कधी मिळणार?

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana: नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळेल याबद्दल माहिती जाणून घेऊ.

 

अनेकांना हा प्रश्न पडलाय कारण आत्ताच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  या केंद्र सरकारच्या योजनेचा 14 वा हप्ता मिळाला आहे . त्यामुळे आता सगळी एकच चर्चा सुरू आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पहिला ₹2000 चा हप्ता कधी त्यांच्या खात्यात जमा होईल आता या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल आणि शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळेल या लेखात आपण पाहणार आहोत.

 

केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत लाभदायक शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये इतकी आर्थिक मदत होते . 3 महिन्याच्या अंतराने ₹2000 चे तीन टप्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते . केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य सरकारने गेल्या अधिवेशनात नमू शेतकरी निधी योजना जाहीर केली होती. राज्य सरकारने सांगितलं होतं की, केंद्र सरकारच्या 6000 रुपयांमध्ये राज्य सरकार सुद्धा 6000 रुपये ॲड करतील. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रति वर्ष 12 हजार रुपये मिळातील . पण नेमकी या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल याविषयी काही स्पष्टता नव्हती.  दरम्यांन आताच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने ‘नमू शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी 4000 कोटी रुपयांची तरदूत केली . राज्यभरातल्या 87 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल असे सुद्धा सरकारकडून सांगण्यात आले.

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजण्याचा पहिला हप्ता कधी मिळणार?

नमो शेतकरी महा सन्माननिधी संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने 28 जुलै 2023 रोजी  एक शासन निर्णय काढला आहे .त्यात म्हटले आहे ,की राज्यात नमो शेतकरी महा सन्माननिधी लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी त्यांच्या नावाने “बँक ऑफ महाराष्ट्र” मध्ये बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. या शिवाय योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर स्वतंत्र आज्ञावली विकसित करण्यात येईल असं सुद्धा या शासन निर्णयात नमूद केले.  पण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची प्रत्यक्ष अंबलबजावणी कधीपासून सुरू होईल. आणि शेतकऱ्यानया आता नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार?  याविषयी अधिक माहिती  देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?..आम्ही राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना देखील या वर्षापासून सुरू केलेली आहे.त्याचं पुढच्या  महिनाभरामध्ये तोही कार्यक्रम सुरू होईल.

 

दरम्यान कृषी विभागातील काही वरिष्ठ अधिकारांनी  सांगितले की, या योजनेसाठी चा “निधी मंजूर झाला आहे की .   पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर  प्राधान्य देण्यात येत आहे. आणि जवळपास एक महिन्याभरात ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे .” नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना माहिती सांगणारी  मराठी टाइम्स24 वरील माहिती कशी वाटली ती कंमेंट करून सांगा 

 

Join Whatsapp Group.

2 thoughts on “नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेची अंमलबजावणी कधीपासून; शेतकऱ्यांना या योजण्याचा पहिला हप्ता कधी मिळणार?”

Leave a Comment