New Covid Variant :पुन्हा कोरोनाचा धोका! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार, ERIS ने जगाची चिंता वाढवली

New Covid Variant : आता जग करोनापासून हळूहळू सावऱ्याला लागला होता.पण मात्र,कोरोनाचा व्हायरस काही आपला पिच्छा सोडताना दिसत नाही.आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाटली.आता नवीन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे (New Covid Variant) रुग्णची झपाट्याने वाढ होताना दिसत आहेत.नव्या व्हेरियंट मूळे जगभरातील शास्त्रज्ञांनाची चिंता वाढली आहे.या नवीन प्रकारच्या व्हेरियंटला एरिस(ERIS) असे नाव देण्यात आले आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराने ब्रिटनला(New Corona Variant in UK ) विळखा घातला आहे.

 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका!

या नवीन प्रकारच्या व्हेरियंटला ब्रिटनमध्ये EG.5.1 असे म्हटले जात आहे.त्याचेच टोपणनाव EG.5.1 Eris असे देण्यात आले आहे. नवा व्हेरियंट हा ओमायक्रॉन पासूनच तयार झाला आहे. हा नवीन प्रकार ओमायक्रॉन पासूनच तयार झालेले म्युटेशन असल्याचे इंग्लंडमधील आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे. सामान्य अशी याची लक्षणे आहेत. या व्हेरियंटची सध्या झपाट्याने वाढ होत आहे.युनायटेड किंगडममध्ये मीडिया रिपोर्टनुसार हा प्रकार कोरोनाचा नवीन असल्याची माहिती मिळाली आहे.तर,रिपोर्टनुसार,ब्रिटनमध्ये एरिस(ERIS) नावाचा कोविड व्हेरियंट वेगाने पसरत आहे.

 

ब्रिटनमध्ये एरिस व्हेरियंटचे वाढते रुग्ण

कोरोना व्हायरस बदलत्या वातावरणानुसार स्वत: मध्ये बदल करत असल्याने नवीन व्हेरियंटचा (New Covid Variant) धोका कायम  आहे.संशोधकांच्या मते, कोरोना विषाणूमध्ये अजूनही सतत म्युटेशन होत आहे. या बदल सर्व देशाने कोरोना बाबत सावध राहण्याची गरज आहे. युनायटेड किंगडममध्ये पण यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) च्या मते,कोविड-19 चा एक नवीन प्रकार प्रसारात आहे.त्यामुळे प्रत्येक देशातील आरोग्य अधिकार्‍यांमध्ये चिंता वाढली आहे.

 

नव्या व्हेरियंटचे लक्षणे काय आहेत?

मीडिया रिपोर्टनुसार,ओमायक्रॉन सारखीच कोरोनाच्या (ERIS) व्हेरियंटची मुख्य लक्षणे आहेत.यामध्ये कोरडा खोकला,नाक चोंदणे,नाक वाहणे, घसा खवखवणे,शिंका येणे,कफ असलेला खोकला,वास कमी होणे आणि स्नायू दुखणे.दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये वास कमी होणे,दम लागणे आणि ताप येणे ही आता मुख्य लक्षणे राहिले नाहीत. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  असे मत वॉर्विक विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर लॉरेन्स यंग यांनी व्यक्त केले आहे.

 

पुन्हा कोविड लाट येणार का?

सध्या कोविड-19 मुळे ब्रिटनमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण प्रति 100,000 लोकसंख्येमागे 1.97 टक्के इतके प्रमाण आहे. देशामध्ये प्रत्येक सात रुग्ण कोरोना संक्रमितांपैकी एका रुग्णास नवीन व्हेरियंटची (एरिस) लागण होत असल्याचे, UKHSA च्या अहवालानुसार हि माहिती मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, नवीन व्हेरियंटची(New Covid Variant) ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोविड लाट येण्याची शक्यता आहे.

 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

 

2 thoughts on “New Covid Variant :पुन्हा कोरोनाचा धोका! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार, ERIS ने जगाची चिंता वाढवली”

Leave a Comment