Sharad Pawar : शरद पवारवर आक्षेपार्ह भाषेत टीका, तरी तरुणाला भाजपाच्या मीडिया सेल ची जबाबदारी

Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या तरुणास भाजपा कडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे . त्याचे नाव निखिल भामरे आहे. निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथील आहे. त्यास भाजपाच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल भामरे च्या या ट्विट नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी निखिल भामरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले होते निखिल भामरे याला जवळपास 50 दिवस तुरुंगवास भोगावा लागला .

निखिल भामरे यांचे ट्विट:

Nikhil bhambare twiet

दरम्यान, आता त्याच निखिल भामरे ला भाजपाकडून मीडिया सेलचे संयोजक पद देण्यात आले आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. निखिल भुमरे यांनी शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर पातळी सोडून टीका करणाऱ्या भाजपाने अधिकृत पद दिल्यामुळे ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

कोण आहे निखिल भामरे?

निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथील राहणारा आहे. दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येते , तो सध्या बी फार्मसी चे शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी भामरे याचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे निखिल भामरेने आभार व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले होते. ‘जे कठीण काळात भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले’, त्या देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार. माझ्या वाईट काळात केलेल्या मदतीचा मी सदैव ऋणी राहील. मी पुन्हा आलो आहे त्या प्रत्येकाचे आभार मानायला त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मला व माझ्या कुटुंबाला माझ्या कठीण काळात मदत केली. ज्यांच्यामुळे मी आता पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झाल्यासारखे वाटते. माझी केस नाशिक (दिंडोरी) पासून ते ठाणे, पुण्यापासून ते वर्तकनगर, नंतर मावळ पर्यंत ते उच्च मुंबई न्यायालय रयत केस मध्ये कोर्टात मजबूतपणे या केसला घड्याळाचे रूप देणाऱ्या लीगल टीम आणि सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद. असे ट्विट निखिल भामरे यांनी केले.

 

1 thought on “Sharad Pawar : शरद पवारवर आक्षेपार्ह भाषेत टीका, तरी तरुणाला भाजपाच्या मीडिया सेल ची जबाबदारी”

Leave a Comment