Nitin Desai : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? जवळच्या मित्रांनी सांगितलं की..

Nitin Desai : नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या कर्तृत्वाने सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवले होते. नितीन चंद्रकांत देसाई हे नाव समोर आलं की डोळ्यासमोर मोठे मोठे सेट, ऐतिहासिक दाखले देणाऱ्या वस्तू उभ्या राहतात.
आज  त्यांच्या अचानक अशा जाण्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. कर्जतच्या एन.डी. स्टुडिओ मध्ये  त्यांनी आपलं आयुष्याचा शेवट केला. त्यांच्या जाण्याची बातमी सर्व दूर पसरल्यानंतर सिनेसृष्टीत, सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
नितीन देसाई यांनी अचानक इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे पोलीस तपासात हळूहळू या बाबी उघड होतील. पण तत्पूर्वी त्यांच्या जवळच्या मित्राकडून याबाबत काही माहिती समोर आली आहे

जवळच्या मित्रांनी काय सांगितलं?

 

सिने इम्प्लॉयीचे सदस्य बीएन तिवारी यांनी ई टाईम्ससोबत बोलताना सांगितलं,की “नितीन देसाई गेल्या काही दिवसापासून आर्थिक अडचणीत होते. त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आणखी कर्जाची गरज भासण्याचा त्यांनी सांगितलं होतं.” तसेच काळात स्टुडिओचा  बिजनेस कमी झाला होता. बरेचशे शूटिंग चे काम मुंबईतच होत होते. त्यामुळे त्यांच्या स्टुडिओ बिजनेस चे नुकसान होत होते.

“मी कालच त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं की मी दिल्लीत असून मुंबईत परतणार आहे पण आता त्यांनी असं का केलं ते माहिती नाही.”नितिन देसाई यांच्या जवळचे मित्र आणि त्यांना चांगल्या प्रकारे ओळखणारे रंगराव चौगुले यांनीही त्यांच्याबाबत ई टाईम्सला माहिती दिली.

 

नितीन देसाई(Nitin Desai) यांच्या निधनानंतर  बरेच जणांनी शोककुळा व्यक्त केली आहे . तसेच आमदार महेश बालदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “आम्ही महिन्याभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. नवीन चित्रपट शूटसाठी येणार आहे. पण एन.डी. स्टुडिओ मध्ये  टीव्ही शोचंच शूटिंग होत होतं. त्याने आर्थिक अडचण काही दूर झाली नाही.”, असं आमदार महेश बालदी यांनी सांगितलं.

काही वर्षांपूर्वी नितिन देसाई (Nitin Desai)यांनी काही वर्षांपूर्वी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड करणे कठीण झाला असल्यामुळे त्यांनी आपली जमीन आणि मालमत्ता तारण ठेवली होती.त्यामुळे ती काही दिवसापासून मानसिक त्रास पासून अडचणीत होते ,अशी प्रथमिक माहिती समोर आली आहे .

नितिन देसाई यांचे स्टुडिओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

2 thoughts on “Nitin Desai : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? जवळच्या मित्रांनी सांगितलं की..”

Leave a Comment