Nitin Desai |आत्महत्येपूर्वी नितीन देसाईच्या 11 ऑडिओ क्लिप व्हायरल : PM,CM आणि DCM यांच्याकडे केली होती अशी मागणी

Nitin Desai Sucide : नितीन चंद्रकांत देसाई कलादिग्दर्शक भव्य दिव्य कलाकृती रुपेरी पडद्यावर अमित ठसा उमटवणारे प्रख्यात दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (57) त्यांनी त्यांच्या एन.डी. स्टुडिओ कर्जत मध्ये बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी परिवारातील सदस्य मित्र आणि वकिलांना 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केलेल्या पाठवल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.

 

स्टुडिओचा  हक्क देऊ नका

  • कर्ज देणाऱ्या संस्थांकडे  एन टी स्टुडिओचा ताबा देऊ नये. एन.डी. स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा अशी विनंती पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिप द्वारे केली आहे.
  • क्लिप मध्ये म्हटले जाते की, कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून आपली आर्थिक फसवणूक आणि छळ झाल्याचे दिसत आहे. अशी सूत्रांनी माहिती सांगितली.
  • वृंदा विचारे यांना देसाई(Nitin Desai) यांच्या सूचनेनुसार त्यांची सहाय्यक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप पाठवल्याचे समजते.

 

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. उद्या एनटी स्टुडिओ मध्ये अत्यसंस्कार होणार आहेत .कलिना फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पंचनाम्यावेळी बोलवण्यात आले.तसेच डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञही उपस्थित होते.जे जे रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. एनडी स्टुडिओतच शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. देसाई यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई असा परिवार आहे.

1 thought on “Nitin Desai |आत्महत्येपूर्वी नितीन देसाईच्या 11 ऑडिओ क्लिप व्हायरल : PM,CM आणि DCM यांच्याकडे केली होती अशी मागणी”

Leave a Comment