OMG 2 vs Gadar 2 : सनी देओलच्या गदरचा बॉक्स ऑफिसवर गदारोळ, पहिल्याच दिवशी केली अक्षय कुमारची सुट्टी

OMG 2 vs Gadar 2 : अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 सनी देओलचा चित्रपट Gadar 2 या आठवड्यामध्ये 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाला समीक्षकांनी खूप चांगले रेटिंग दिले आहे.पण चाहत्यांना 22 वर्षांनंतर येणाऱ्या गदर 2 बद्दल वेड लागले होते. याचा परिणाम पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला . चाहत्यांनी सनी देओल च्या एका गर्जने नुसार थेटर मध्ये आरडाओरडा करत जोरदार जल्लोष केला आहे. पहिल्या दिवशी सनी देओलचा Gadar 2 हाउसफुल राहिला व चांगली कमाई करण्यात यशस्वी झाला. कमाईच्या बाबतीत पहिल्या दिवशी Gadar 2 ने OMG 2 ला मागे टाकले आहे.

‘गदर 2’ चित्रपटाची क्रेझ चेन्नई ते दिल्ली एनसीआर पर्यंत पहायला मिळाली. “सो सुनार की, एक लोहार की” चित्रपट गदर टू बॉक्स ऑफिसवर अशा प्रकारे धडकला की पहिल्याच दिवशी OMG 2 ला मागे टाकले. सनी देओलच्या Gadar 2 मध्ये दम नसला तरी ,पण अजूनही हिंमत आहे.

सनी देओलचा सुपरहिट असलेला ‘गदर ’ चित्रपटाचा ‘गदर 2’ तब्बल 22 वर्षानंतर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची क्रेझ स्पष्टपणे दिसून येत आहे. या चित्रपटाची ॲडव्हान्स मध्ये बुकिंग 20 लाखांहून अधिक तिकिटे विकले गेले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने 40 कोटीहून अधिक कमाई केली आहे.

 

अक्षय कुमारच्या माऊथ पब्लिसिटीचा चित्रपटाला चांगला फायदा झाला आहे. पण कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारचा OMG 2 पहिल्या दिवशी केवळ 9.5 कोटी कमवू शकला. अक्षय कुमारचा OMG 2 आणि आणि (OMG 2 vs Gadar 2)सनी देओलचा Gadar 2 चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांची Gadar 2 वर जास्त क्रेझ असल्यामुळे OMG 2 चित्रपटाची ओपनिंग खूपच कमी झाली असली तरी, चित्रपटाच्या कथेत ताकद आहे त्यामुळे चित्रपट खूप आवडला आहे.

 

सनी देओलच्या Gadar 2 चित्रपटाबद्दल भोपाळ, लखनऊ ,मुंबई, छोट्या शहरापासून ते दिल्ली एनसीआर पर्यंत चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल क्रेझ दिसून येत आहे. Gadar 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन वीकेंडपर्यंत 70 ते 80 कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमार माऊथ पब्लिसिटी चा फायदा मिळून OMG 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन वीकेंडपर्यंत 40 कोटी पर्यंत पोहचू शकते.

 

हेही वाचा  

15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का करतात ध्वजारोहण?

Adipurush OTT Release : थिएटरनंतर आता ओटीटीवर रिलीज झाला ‘आदिपुरुष’, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा?

Jailer Box Office: 5 कोटींनी कमी पडला रजनीकांतचा ‘जेलर’, मोडू शकला नाही पठाणचा विक्रम

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

1 thought on “OMG 2 vs Gadar 2 : सनी देओलच्या गदरचा बॉक्स ऑफिसवर गदारोळ, पहिल्याच दिवशी केली अक्षय कुमारची सुट्टी”

Leave a Comment