Online Fraud: महिला बँक मॅनेजर ची ऑनलाईन फसवणूक, खात्यातून चक्क 5 लाख 10 हजार घेतले काढून

Online Fraud : आपण वारंवार ऑनलाईन तक्रारी ऐकत असतो. अशातच नागपुर शहरातील चक्क बँक मॅनेजर  महिलेची तब्बल 5 लाखाची(Online Fraud) फसवणूक झाली. ही घटना उघडकीस आल्यास  या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ऑनलाइन मार्केट प्लेस वर घरातील काही सामान विकण्यासाठी टाकलं होतं  त्याचं मात्र खरेदी न होता 5 लाख 10 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला याबद्दल नागपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

या प्रकरणाविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , स्मिता विश्वास (31) यांनी ऑनलाईन साईटवर त्यांच्या घरातील रेफ्रिजेटर आणि सोप्या चे फोटो आणि विक्री साठी उपलब्ध असल्याचा तपशील शेअर केला होता. त्यांची ही जाहिरात पाहून एका व्यक्तीच्या त्यांना फोन आला. त्या यावेळेस त्या व्यक्तीने ते सामान खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे कळवलं .त्यासंदर्भात दोघांचं बोलणं झाल्यानंतर पिढीत महिला कडे केवळ व्हेरिफिकेशन  म्हणून चेक करण्यासाठी ₹60 पाठवण्याची मागणी केली. त्यावर त्या महिलेने त्याला प्रसिद्ध प्रतिसाद देत पैसे पाठवले. पण या व्यवहारात झालेल्या फसवणूक मुळे महिला त्रस्त झाली आहे.

हे सुद्धा वाचा 

Online Fraud Complaint | ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडलात तर काय कराल? पैसे मिळवण्यासाठी लगेचच ‘या’ पोर्टलवर तक्रार करा

कशाप्रकारे आरोपीने महिलेस गंडवले?

सुरुवातीला आरोपीने महिलांकडे फक्त 60 पाठवण्याची मागणी केली. महिलांनी ते पाठवल्यानंतर तिच्या बँक अकाउंट मधून काही वेळातच 1 लाख 01 रुपये काढण्यात आले. हे पैसे परत करण्याच्या नावाने आरोपींनी महिलेच्या खात्यात वापस नऊ हजार रुपये टाकले. नंतर आरोपीने महिलाच्या खात्यातील सर्वच रक्कम 5 लाख 10 हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी फसवणूक आणि सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. अशा प्रकारे पोलिसांनी माहिती दिली.

 

ही काळजी आपल्याला घ्यायला हवी

अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणूक(Online Fraud) च्या अनेक घटना दररोज घडत आहेत. तुमच्यासोबत हि फसवणूक  होऊ शकते. कारण कुठल्याही लिंक वर क्लिक केल्याशिवाय आरोपी थेटपणे पैसे काढू शकत नाही. तर ओएलएक्स वर जाहिराती टाकणाऱ्या विक्रेत्यांना आधी विश्वास घेऊन फसवणूक केली जाते. या प्रकरणात असेच घडले आहे, ‘विक्रेत्याला विश्वासात घेऊन  त्याच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. तसेच ओएलएक्स वर वस्तू विकत घेत असताना  किंवा विकत असताना काळजी घ्या. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवू नका. आणि  व्यवहारात कधीही कोणाला ओटीपी शेअर करू नका.

1 thought on “Online Fraud: महिला बँक मॅनेजर ची ऑनलाईन फसवणूक, खात्यातून चक्क 5 लाख 10 हजार घेतले काढून”

Leave a Comment