Pakistan Imran Khan : इम्रान खानच नव्हे तर या पंतप्रधानांवरही झालीय अटकेची कारवाई, एका माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा

Pakistan Imran Khan :पाकिस्तान मध्ये  माजी पंतप्रधानांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही.माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Pakistan Imran Khan)यांना शनिवारी (5 ऑगस्ट) लाहोरमधील त्यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे.तोषखाना प्रकरणा मध्ये इस्लामाबाद येथील कोर्टाने त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही अटक करण्यात आली.पाकिस्तानमध्ये याआधी पण पंतप्रधान वर कारवाई करण्यात आली आहे. तर एका पंतप्रधानाला फाशीची शिक्षा देण्यात अली होती.

 

हुसेन शहीद सुहरावर्दी 

हुसेन शहीद सुहरावर्दी यांचा कार्यकाळ सप्टेंबर 1956-ऑक्टोबर 1957 असा होता. पाकिस्तानचे हे पाचवे पंतप्रधान होते. त्यांना जानेवारी 1962 मध्ये अटक करण्यात आली. सुहरावर्दी याना जनरल अयुब खान यांनी सरकार ताब्यात घेतल्यानंतर पाठिंबा देण्यास नकार दिल्याचा आरोप होता.

त्यानंतर राजकारणापासून इलेक्टोरल बॉडीज डिसक्वॉलिफिकेशन ऑर्डरद्वारे,त्यांना बंदी घालण्यात आली. नंतर त्यांच्यावर 1960 मध्ये, अब्दोचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आणि नंतर त्यांना जानेवारी 1962 मध्ये अटक करण्यात आली,खोट्या आरोपांनुसार खटला न चालवता त्यांना कराचीच्या सेंट्रल जेलमध्ये एकांत तुरुंगात ठेवण्यात आले.

 

झुल्फिकार अली भुट्टो

झुल्फिकार अली भुट्टो हे ऑगस्ट 1973 ते जुलै 1977 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते.त्यांना राजकीय विरोधकाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली सप्टेंबर 1977 मध्ये अटक करण्यात आली होती. भुट्टो यांच्या अटकेला कोणताही कायदेशीर आधार नव्हता,म्हणून त्यांना लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ख्वाजा मोहम्मद अहमद समदानी यांनी सुटका केली होती.

मार्शल लॉ रेग्युलेशन 12 अंतर्गत झुल्फिकार अली भुट्टो याना पुन्हा अटक करण्यात आली. या कायद्याची नियमाने अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना सुरक्षेच्या विरोधात काम करणार्‍या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार दिला. या कायद्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. शेवटी झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 4 एप्रिल 1979 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

 

बेनझीर भुट्टो

पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो या दोनदा(डिसेंबर 1988-ऑगस्ट 1990 आणि ऑक्टोबर 1993-नोव्हेंबर 1996) पंतप्रधान होत्या. बेनझीर यांनी झियाउल हक (1977-1988) च्या हुकूमशाहीत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम केले. बेनझीर या त्यांच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तानात आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना 90 दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले.त्यानंतर बेनझीर भुट्टो यांना स्वातंत्र्यदिनी कराचीमध्ये एका रॅलीत सरकारचा निषेध केल्याबद्दल ऑगस्ट 1986 मध्ये अटक करण्यात आले होते.

 

त्यानंतर एका स्विस कंपनीकडून लाच घेतल्याच्या आरोपावरून सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले.याविरोधात बेनझीर भुट्टो यांनी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढली.एप्रिल आणि ऑक्टोबर 1999 मध्ये बेनझीर भुट्टो यांच्याविरुद्ध दोनदा अटक वॉरंट जारी करण्यात आले.

 

शाहिद खाकान अब्बासी

जानेवारी 2017 ते मे 2018 पर्यंत पीएमएल-एनचे शाहिद खाकान अब्बासी यांनी पंतप्रधान म्हणून काम केले. जुलै 2019 मध्ये आयात करार देताना कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केल्याप्रकरणी 12 सदस्यीय NAB टीमच्या वतीने त्यांना अटक करण्यात आली. नैसर्गिक संसाधन आणि पेट्रोलियम मंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2020 रोजी अदियाला तुरुंगातून सुटका झाली.

 

शाहबाज शरीफ 

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शेहबाज शरीफ याना NAB मनी लाँड्रिंग प्रकरणात लाहोर उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर 28 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली.सुमारे सात महिन्यांनंतर लाहोरच्या कोट लखपत सेंट्रल जेलमधून त्यांची सुटका झाली.

 

 

JOIN WHATSAPP GROUP  , FOLLOW INSTAGRAM ,FOLLOW TWITTER , FOLLOW FACEBOOK

Leave a Comment