Palak Tiwari | बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेल्यानंतर चक्क श्वेता तिवारी हिने मुलीला दिली ही धमकी, पलकचा धक्कादायक खुलासा

Palak Tiwari : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. पलक तिवारी हिला थेट सलमान खान (Salman Khanयाच्यासोबत काम करण्याची संधी मिळालीये. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत होती. फक्त पलक तिवारी हिच नाही तर या चित्रपटातून शहनाज गिल हिने देखील बाॅलिवूडमध्ये (Bollywood)  डेब्यू केला आहे. मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि किसी का भाई किसी की जान हा चित्रपट फ्लाॅप गेला. हा सलमान खान याच्यासाठी मोठा झटका नक्कीच होता.

 

विशेष म्हणजे किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना पलक तिवारी ही दिसली होती. नुकताच आता पलक तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. आता पलक या मुलाखतीमुळे प्रचंड चर्चेत आलीये. विेशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना पलक तिवारी ही दिसत आहे. यावेळी पलक हिने मोठे खुलासे देखील केले आहेत.

पलक तिवारी म्हणाली की, मी 15 किंवा 16 वर्षांची असताना माझा एक बॉयफ्रेंड होता. त्यावेळी मी शाळेत होते. आम्ही कायमच माॅलमध्ये सोबत फिरत होतो. मात्र, एकदा मी आईला खोटे बोलून त्याच्यासोबत फिरण्यासाठी गेले होते त्यावेळी ते तिला कळाले आणि तिला प्रचंड राग आला. मुळात म्हणजे मला खोटे बोलता येत नाही आणि मी लगेचच पकडली जाते.

हे सुद्धा वाचा… 

Shweta Tiwari | उफ्फ तेरी अदा! काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता तिवारी हिचा जलवा, 42 व्या वर्षातही जबरदस्त…

 

मी जर बॉयफ्रेंडसोबत डेटिंगला जात असेल आणि आईला काही खोटे कारण दिले तर ती लगेचच मला पकडते. आई मला नेहमीच बोलते की, दोन तासांमध्ये तुझे सत्य मला कळते. इतकेच नाही तर मी डेट कोणाला करू नये, यासाठी तिने अनेकदा मला थेट धमक्या या देखील दिल्या आहेत. मात्र, तिच्या धमक्या ऐकून मला कायमच आता हसू येते.

तुझे केस कट करेल, तुला गावी पाठवून देते. अशाप्रकारच्या धमक्या आई मला कायमच देते, असे सांगताना पलक तिवारी ही दिसली आहे. या मुलाखतीमध्ये पलक तिवारी ही आपले लहानपणीचे अनेक किस्से सांगताना दिसली आहे. इतकेच नाही तर शाळेमधील जुन्या आठवणी ताज्या करताना देखील पलक तिवारी ही दिसली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी(Palak Tiwari)  हिचे नाव सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान याच्यासोबत जोडले जात आहे. हे दोघे एकमेकांना डेट कर असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, अजूनही पलक तिवारी किंवा इब्राहिम अली खान यांनी त्यांच्या नात्यावर काहीच भाष्य हे केले नाहीये. मात्र, अनेकदा हे दोघे पार्ट्यांना सोबत हजेरी लावतात.

1 thought on “Palak Tiwari | बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेल्यानंतर चक्क श्वेता तिवारी हिने मुलीला दिली ही धमकी, पलकचा धक्कादायक खुलासा”

Leave a Comment