Parsis New Year 2023: आज आहे पारशी नववर्ष; जाणून घ्या पतेती आणि नवरोझमधील फरक?

Parsis New Year 2023  : आज बुधवार 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्षाची सुरुवात होत आहे. (16 august 2023 parsi new year) पारशी लोक जुन्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचा आरंभ असे दोन दिवस साजरी करतात.पारशी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी पतेती सण(16 august 2023 pateti 2023)(पतेती 2023) साजरा करतात, आणि पारशी वर्षाचा पहिला दिवस 16 ऑगस्ट रोजी पारशी समाज नववर्ष साजरा करतात.हा पारशी नूतनवर्ष सन 1392 प्रारंभ होत असून, पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz)म्हणून देखील ओळखला जातो.

 

‘पतेती’ आणि ‘नवरोझ’ (Pateti and Nowroz) काय दिवस असतो? 

पतेतीच्या(parsi new year 2023) दिवशी पारशी लोक गेल्या वर्षभरात झालेल्या चूकांची आणि गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चातापाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर पारशी समाजाचं नवं वर्षाचा पहिला दिवस नवरोझ असतो. नवरोझच्या दिवशी हिंदू धर्माप्रमाणेच पारसी धर्माचे लोकही अग्नीची पूजा करतात.आणि त्यात यज्ञही करतात. पारशी लोक या दिवशी नवीन कपडे घालतात तसेच एकमेकांना गळाभेटी देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देतात. नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणींना भेटतात. या उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करण्याची देखील पारशी समाजात परंपरा आहे.

 

भारतात शहेनशाही कॅलेंडरनुसार होते नववर्षाची सुरुवात

भारतात पारशी हा अत्यंत लहान समुदाय आहे. हा समुदाय शहेनशाही, फसली आणि कदिमी अशा तीन विभागात विभागला आहे. भारतातील पारशी लोक शहेनशाही कॅलेंडर नुसार नववर्ष साजरं (Parsis New Year begins according to the imperial calendar In India) करतात. त्यामुळे भारतात पारशी नववर्ष हे ऑगस्ट महिन्यात साजरे केले जाते. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारसी नवनवर्षाचा पहिला दिवस असतो आणि तो ‘नवरोझ’ म्हणून साजरा केला जातो. ही सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे, असा नवरोझचा अर्थ होतो. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना केली जाते आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.

Parsis New Year 2023

पतेती उत्सवाची सुरुवात कश्याप्रकारे झाली? (How did the Pateti festival beginning)

झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार 3000 वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरवात केली. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा करण्याचा असतो.

भारतामधील  पारसी (Parsis in India)

भारत हा जगातील एकमेव देश आहे जेथे सर्व धर्मांचे लोक एकत्र राहतात. प्राचीन काळापासून भारतात इतर देशांतील लोक वेगवेगळ्या कारणाने आले आणि येथेच स्थायिक झाले. त्याच प्रमाणे पारशी लोक सुद्धा भारतात आले आणि येथे स्थायिक झाले. पारशी समुदायाचे मुळ हे इराण समजले जाते. मात्र 14 व्या शतकात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मांतराची मोहीम सुरू होती. पारशी लोकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. या काळात काही लोकांनी इस्लाम स्वीकारला तर काही लोक आपले प्राण वाचवून भारतात आले आणि येथेच स्थायिक झाले. सध्या भारतात जवळपास 60 हजारांहून अधिक पारशी लोक राहतात.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update