PM Modi Invite Baramati Farmer : बारामतीच्या ‘शेतकऱ्याला’ थेट पंतप्रधानांचे निमंत्रण; काय आहे प्रकरण?

PM Modi Invite Baramati Farmer :  पुणे जिल्ह्यातील बारामती येथील अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या बांधाला बांध असणाऱ्या शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला (Independence Day 2023) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी((Prime Minister Narendra Modi) ) यांनी समारंभाचे निमंत्रण दिले आहे.दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला (Independence Day Events in Delhi) निमंत्रण दिलेल्या शेतकऱ्याचे नाव अशोक घुले हे ढेकळवाडी येथील राहणारे रहिवासी आहेत . विशेष म्हणजे अशोक घुले हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. परंतु त्यांनी आपल्या शेतातून भरघोस असे उत्पन्न घेतले आहे.

फक्त 60 गुंठे शेती अशोक सुदाम घुले: अशोक सुदाम घुले ढेकळवाडी गावातील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे फक्त गावात 60 गुंठे शेती आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीचा परिसर कमी पावसाचा भाग म्हणून गणला जातो. अशोक घुले हे पावसाची कमतरता असल्यामुळे शेतामध्ये मका, बाजरी, सोयाबीन अशा प्रकारे इत्यादी पिके घेतात. तसेच शेती करीत असताना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनचा व्यवसाय सुरू केला. अशोक घुले यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर आधारित आहे तसेच त्यांना शेतीतून चांगले उत्पन्नही मिळते.

 

विशेष सन्मान अशोक घुले : पंतप्रधान कृषी सन्मान निधीतून अशोक घुले यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची 14 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. रक्कम जास्त नसली तरी , या रकमेतून त्यांना शेतीसाठी लागणारे खते, बियाणे घेण्यासाठी याचा फायदा झाला. आपल्याला या योजनांमधून आर्थिक फायदा झाल्यामुळे घुले यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. आता अशोक घुले यांना तसेच त्यांच्या पत्नीला स्वतंत्र दिनाच्या सोहळ्याला दिल्लीतील लाल किल्ला येथे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण(PM Modi Invite Baramati Farmer) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. तसेच त्यांना विशेष सन्मान देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.

अशोक घुले यांनी आपल्या पत्नीला गमतीने विचारले की फिरायला कुठे जायचे का? त्यावर पत्नीने उपरोधाने मला दिल्लीला नेता का? यावर घुले यांनी असे उत्तर दिले, आपल्याला दिल्ली येते कार्यक्रमासाठी निमंत्रण असाल्याचे सांगितले . अशोक घुले यांना ही माहिती तालुका कृषी अधिकारी प्रियंका बांदल यांनी आपली निवड झाल्याचे सांगितले.

केंद्र सरकारच्या योजनेबद्दल अशोक घुले सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. मात्र सध्या खते बियाण्याचे दर वाढत चाललेले आहेत. यामुळे मोदी सरकारने या योजनेमध्ये एक 1000 रुपये ची वाढ झाली पाहिजे. अशी अपेक्षा अशोक घुले यांनी व्यक्त केली.

 

PM Modi Invite Baramati Farmer

हेही वाचा 

चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशामध्ये डंका; ‘या’ कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार

राष्ट्रध्वज फडकवण्याचे ‘हे’ आहेत १० नियम; नियमाचे उल्लंघन केल्यास होतो तुरुंगवास..

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

 

1 thought on “PM Modi Invite Baramati Farmer : बारामतीच्या ‘शेतकऱ्याला’ थेट पंतप्रधानांचे निमंत्रण; काय आहे प्रकरण?”

Leave a Comment