Bigg Boss OTT 2 | युट्यूबर्सच्या शर्यतीत पूजा भट्ट मारणार बाजी? ‘या’ कारणांमुळे ठरू शकते विजेती

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी 2 हा शो आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे.चाहत्याचा लोकप्रिय शो आहे.या शो चा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यासाठी जबरदस्त वोटिंग करत आहेत.यंदाचा सिझन कोण जिंकणार याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पण ग्रँड फिनालेच्या एक आठवड्याआधी ‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये डबल एलिमिनेशन झालं.आणि जद हदिद ,अविनाश सचदेव हे दोन स्पर्धक बेघर झाले आहेत. सध्या टॉप 6 स्पर्धकांमध्ये एल्विश यादव, ,बेबिका धुर्वे,मनीषा राणी,अभिषेक मल्हान,जिया शंकर आणि पूजा भट्ट याचा समावेश आहे. यामध्ये अभिषेक आणि एल्विश या दोघांपैकी कोणीतरी विजेतेपदाचा दावेदार  ठरू शकतो, याची चर्चा सोशल मीडिया वर सुरु आहे.

 

बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT 2) सिझनमध्ये एल्विश आणि अभिषेकच्या याच्या लढाई मुळे युट्यूबर्सवालाचं पारडं जड पाहायला मिळत आहे.मात्र,यांच्या लढाईत अभिनेत्री पूजा भट्ट हिला कमकुवत स्पर्धक म्हणणे हि चुकीचं ठरेल .कारण पहिल्या दिवसापासून पूजाची खेळी दमदार आहे. पूजा मात्र टास्क दरम्यान मर्यादा पाळून खेळताना दिसली. काही  स्पर्धकांकडून खेळाच्या दरम्यान मर्यादा ओलांडल्या जात होत्या.त्यामुळे पूजा सुद्धा या सिझनची विजेती ठरू शकते.

पूजाच्या खेळीचं कौतुक हि केले जात आहे.अशातच जिया शंकरच्या आईनेही पूजाचे कौतुक केलं होते.” “पूजाने बिग बॉसच्या घराला खरं घर बनवलं आहे. तिच्यामुळे बिग बॉसच्या घरात मर्यादांचं पालन होतंय. ती या शोमध्ये कधीच हिंसक होऊन खेळली नाही”, असे त्या म्हणाल्या होत्या. पूजा हि तिच्या टास्क किंवा नॉमिनेशन्स यासाठी कधीही ती डगमगली नाही.टीआरपीसाठी किंवा एखाद्या एपिसोडमध्ये प्रकाशझोतात येण्यासाठी पूजाने आपल्या मूल्यांशी कधी तडजोड केली नाही.

 

बिग बॉसचा विजेता(Bigg Boss OTT 2) कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूजा भट्ट ला प्रश्न विचारण्यात आला कि विजेता कोण ठरेल त्यावेळेस अभिषेक मल्हानचं नाव तिने घेतले.मात्र अभिषेकबद्दल गेल्या आठवड्यापासून नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे याचा फायदापूजा भट्टला होऊ शकतो.

 

14 ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर रात्री 9 वाजता बिग बॉस ओटीटी 2 (Bigg Boss OTT 2)चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजेत्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही नेटकरी चा दावा आहे की, अखेरच्या टप्प्यात एल्विश आणि अभिषेक या दोघांमध्येचं टक्कर होणार…

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

 

Leave a Comment