विमानतळावर महिला म्हणाली, ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’, अन् उडाली खळबळ

Pune News : १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला.त्यामुळे ते पुणे येते दौऱ्यावर होते. यामुळे  पुणे शहराची सुरक्षा व्यवस्था कडक केली होती.आता पुणे दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. एक धक्कादायक घटना पुणे विमानतळावर घटना घडली आहे.महिलेने माझ्याकडे बॉम्ब असल्याचे विमानतळावर सांगितले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. त्यानंतर महिलेस त्वरित ताब्यात घेण्यात आले.

 

कसा घडला प्रकार

दिल्लीला निघालेली प्रवासी पुणे विमानतळावर गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला. या महिलेस प्रवासी महिला चेकींग करताना म्हणाली,‘माझ्याकडे बॉम्ब आहे’. त्यानंतर महिलेला पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले.त्यामुळे विमानतळावर खळबळ उडाली. त्या महिलेची कसून चोकशी करण्यात आली आहे.’निती कपलानी’ असे त्या महिलेचे नाव आहे. त्यानंतर पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

Leave a Comment