Ratan Tata Biodata : जाणून घ्या रतन टाटा यांनी पहिल्या नोकरीसाठी Resume कसा बनवला? अतिशय मनोरंजक कथा

Ratan Tata Biodata : टाटा समूहाचा १५५ वर्षांचा वारसा पुढे नेणारे रतन टाटा आज जगात एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. फार कमी लोकांना माहिती असेल की रतन टाटा यांनी देखील एक कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने ट्रिलियन डॉलरचा व्यवसाय निर्माण केला. रतन टाटा यांना पहिली नोकरी मिळाली. तेव्हा त्यांनी त्यांचा बायोडाटा( Biodata) कसा तयार केला आणि त्यांना पहिली नोकरी कशी मिळाली? आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

 

रतन टाटा यांचा पहिला बायोडेटा(Ratan Tata Biodata)

भारतात परत आल्यानंतर रतन टाटा यांना IBM मध्ये नोकरी मिळाली पण त्यांचे गुरू जेआरडी टाटा या निर्णयावर खूश नव्हते. रतन टाटा यांनी आठवण करून सांगितले की, “त्यांनी मला एके दिवशी फोन केला आणि सांगितले की तुम्ही इथे भारतात राहून IBM साठी का काम करू शकत नाही.” टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी रतन टाटा यांना त्यांचा बायोडेटा(Ratan Tata Biodata)जेआरडी टाटा यांच्यासोबत शेअर करावा लागला, पण त्यावेळी त्यांच्याकडे त्यांचा बायोडेटा नव्हता.

टाटा समूहात नोकरी मिळवण्यासाठी रतन टाटा यांनी त्यावेळी आयबीएम कार्यालयात इलेक्ट्रिक टाइपरायटरवर आपला बायोडाटा तयार केला. त्यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले की मी आयबीएम कार्यालयात होतो आणि मला आठवते की, जेआरडी टाटा यांनी मला माझा बायोडाटा मागितला, जो माझ्याकडे नव्हता. ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाईपरायटर होते. त्यामुळे मी एके दिवशी संध्याकाळी मी बसून त्या टाईपरायटरवर बायोडाटा टाईप करून त्यांना दिला.

1962 मध्ये पहिली नोकरी मिळाली (Ratan Tata)

आपला बायोडाटा दिल्यानंतर रतन टाटा यांना 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. रतन टाटा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध अब्जाधीशांपैकी एक आहेत. रतन टाटा यांना टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून बहुतेक लोक ओळखतात ज्यांनी कंपनीला नवीन उंचीवर नेले, परंतु फार कमी लोकांना हे माहित आहे की, रतन टाटा यांना एका आयटी फर्ममध्ये काम करायचे होते आणि स्वत: JRD टाटा यांनी त्यांना टाटा समूहात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले होते.

आता इंटरनेटवर पुन्हा समोर आलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये, रतन टाटा यांनी टाटा समूहात नोकरी मिळविण्यासाठी आपला सीव्ही (Ratan Tata Biodata) कसा तयार केला हे उघड केले आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की’ रतन टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि ते अमेरिकन जीवनशैलीने इतके प्रभावित झाले की ते लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक होण्यास तयार झाले. मात्र, आजीची प्रकृती खालावल्याने टाटा यांना भारतात परतावे लागले.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “Ratan Tata Biodata : जाणून घ्या रतन टाटा यांनी पहिल्या नोकरीसाठी Resume कसा बनवला? अतिशय मनोरंजक कथा”

Leave a Comment