‘दिग्दर्शकासोबत शरीरसंबंध’….’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील अभिनेत्रीला आला बॉडी शेमिंगचा वाईट अनुभव

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या रंग रूपाला आणि दिसण्याला प्रचंड महत्त्व दिले जात आहे. कला क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला काम करण्यासाठी त्याच्या गुणवत्तेपेक्षा रंगरूप , बॉडी शेमिंग या समस्येला तोंड द्यावे लागते. असे काही अभिनेत्रींनी त्यांचा अनुभव आपल्या चाहत्या बरोबर शेअर केला आहे. असाच अनुभव सध्या सिनेमा चालू असलेल्या ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमा मधील अभिनेत्री अंजली आनंद हिला बॉडीशेमिंग मुळे आलेला अनुभव वर तिने भाष्य केले.

अंजली आनंद हिला अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला भरपूर मेहनत करावी लागली आहे. ती सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमामधून रुपेरी पडद्यावर झळकत आहे. सध्या तिच्या सिनेमातील भूमिकेवर चांगली चर्चा गाजत आहे. मात्र तिला अभिनय क्षेत्रात येण्याआधी तिच्या शरीरसृष्टी वरून तिला भरपूर ट्रोल केलं होतं. ‘ तू जाड आहेस तुला अभिनय क्षेत्रात काम करता येणार नाही’ असे म्हणून बरेच वेळेस तिला नकार देण्यात आला. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये तिने हे भाष्य केले आहे.

अंजली ने सांगितले की, “सिनेमा किंवा मालिका मध्ये पूर्वी जाड लोकांना फक्त खाण्याची भूमिका दिली जात असे. जसे एक जाड मुलगी पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खाते सर्च दाखवलं जात होतं. पण सध्या बदलत्या काळानुसार आता लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, त्यामुळे आता जाड माणसांना फक्त खाण्यापुरतेच दाखवू नये.” असे तिने सांगितले.

पुढे तिने सांगितले की, मी ’10 वर्षांपूर्वी मी एका एक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी मला वेळोवेळी सांगण्यात आले, की तू अभिनेत्री बनू शकत नाहीस. मी माझे प्रयत्न कायम करत राहिले. तर मला एका मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी मला ट्रोल केलं होतं. “जाड मुलीला कोणी काम देतं का, दिग्दर्शकासोबत नक्की शारीरिक संबंध ठेवले असतील…. असे लोक म्हणतात. ‘ फक्त लठ्ठ आहे म्हणून मुलगी पुढे जाऊ शकत नाही का? मला कळत नाही की लोक इतके वाईट विचार कसे करू शकतात? सध्या अशा लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

अंजली ने, “रॉकी और रानी की प्रेम कहानी” सिनेमा पूर्वी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सध्या तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. इंस्टाग्राम वर पण तिचे फॉलोवर्स भरपूर आहेत.

 

JOIN WHATSAPP GROUP  , FOLLOW INSTAGRAM ,FOLLOW TWITTER ,FOLLOW FACEBOOK

1 thought on “‘दिग्दर्शकासोबत शरीरसंबंध’….’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील अभिनेत्रीला आला बॉडी शेमिंगचा वाईट अनुभव”

Leave a Comment