Rohit Pawar T-Shirt : फक्त मुद्द्याचं बोलूया… रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळ अधिवेशनात चर्चा

Rohit Pawar T-Shirt :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे. अशी मागणी करत नुकतेच आंदोलन केले होते .तसेच युवकांच्या सह्यांचे पत्र देखील त्यांनी नुकतेच मंत्री उदय सामंत यांना दिले होते. त्यानंतर त्यांनी आज  तर टी-शर्ट घालून विधानभवनात प्रवेश केला. रोहित पवार यांनी क्रीम कलर  या जॅकेटवर कर्जत एमआयडीसी (MIDC) बाबत भाष्य करण्यात आलं आहे. या टी-शर्ट वर समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात एमआयडीसी असं लिहिलेलं असून मागच्या बाजूला ‘ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया, आणि फक्त मुद्द्याचं बोलूया! असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

रोहित पवार कर्जत एमआयडीसी साठी  कायम आग्रही

कर्जत मध्ये एमआयडीसी यासाठी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार कायम आग्रही आहेत. रोहित पवार वारंवार आक्रमक भूमिका घेत आहेत. याआधी त्यांनी भर पावसात उपोषणही केलं अधिवेशनाचा शेवटचा आठवडा राहिला आहे. अशातच रोहित पवार यांनी कर्जत मधील एमआयडीसी चा मुद्दा लावून धरला आहे रोहित पवार यांनी आज हटके टी-शर्ट परिधान करत अधिवेशनाला हजेरी लावल्याने टी शर्ट ची सर्वत्र चर्चा होत आहे

 

उद्योग मंत्र्यांना जॅकेट आवडलं असेल तर उद्योगाची प्रश्न सोडवावे: रोहित पवार

या टी-शर्ट बद्दल विचारले असता पवार म्हणाले की हे टी-शर्ट मला माझ्या मित्राने दिलं आहे माझ्या एका युवा मित्राने हे मला  दिले आहे मी काही जे मुद्दे विधानसभेत मांडत आहे. त्याबाबत या युवा ने मला हे जाकीट दिलं आहे काही लोक   खालच्या पातळीवर बोलून समाजात तेढ निर्माण  करत आहेत. आज विधानसभांमध्ये  योगायोगाने आलो तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत आले, तर उद्योग मंत्र्यांना देखील हा (Rohit Pawar T-Shirt) टी-शर्ट आवडले असेल तर त्यांनी उद्योगाची प्रश्न सोडवावे. याबाबत पवार यांनी ट्विट देखील केला आहे. ज्यात त्यांनी या टी-शर्ट च्या मागची गोष्ट सांगितली आहे.

 

1 thought on “Rohit Pawar T-Shirt : फक्त मुद्द्याचं बोलूया… रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळ अधिवेशनात चर्चा”

Leave a Comment