Sadhguru Relationship Tips: लैंगिक जीवनात एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य?

Sadhguru Relationship Tips: सध्याच्या जगामध्ये दररोज नवीन नवीन बद्दल होत आहेत .जसा जसा प्रकारे व्यक्ती ची जीवनशैली(Lifestyle) ,इच्छा आणि आवड बदलत जात आहे .त्यामध्ये प्रामुख्याने जी एका गोष्ट तरुणांमध्ये सर्वाधिक वाढत जात आहे ती म्हणजे कॅज्युअल सेक्स.या बाबीमुळे वैयक्तिक जीवनावर कसा परिणाम होतो  ,त्यामुळे प्रत्येकजण सावधानगिरी बाळगून राहण्याचा सल्ला देतो .सदगुरूंनी सांगितले की,आजकाल चे लोक फक्त शारीरिक संबंध मनोरंजनासाठी करतात. पण या बाबत सद्गुरूंनी जे काही सांगितले ते तुम्हाला विचार करायला लागेल.सद्गुरू सांगतात ,की शारीरिक सुखासाठी एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे याचा ट्रेंड वाढत जात आहे. याचे   परिणाम माणसाच्या वैयक्तिक जीवनावर कसे होतात , याबद्दल सदगुरूंनी विचार मांडले आहेत .

 

सदगुरूंनी विद्यार्थ्याच्या प्रश्नावर दिले उत्तर..

Sadguru Relationship Tips

महाविद्यालयीन मुलं-मुलींना भावनाविरहित शारीरिक संबंध बनवण्याच्या तरुणांमधील वाढत्या प्रवृत्तीबद्दल विचारले.यावर सदगुरूंनी आपले विचार मोकळेप्रमाणे मांडले आणि ही वारंवार शारीरिक जवळीक संपूर्ण आयुष्य कसे उध्वस्थ करते हे सांगितले .  

 

 

बंधने जितकी जास्त तितका गोंधळ

Sadguru Relationship Tips

सद्गुरुंनी स्पष्ट सांगितले की ,या भौतिक स्मृतीला धावानुबंध म्हणतात जी रक्त किंवा शारीरिक संबंधांद्वारे जमा होते.त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीत हस्तांदोलन किंवा मिठी मारण्याऐवजी हात जोडून अभिवादन करण्याची परंपरा आहे. शरीराची ही बंधने जितकी जास्त तितका गोंधळ वाढत जाईल. त्यामुळे आयुष्यात गोंधळ निर्माण होतील .

 सर्व काही शरीर लक्षात ठेवते

Sadguru Relationship Tips

आपले शरीर हे  पिढ्यानपिढ्या गोष्टी कशा लक्षात ठेवते हे सांगण्यासाठी सद्गुरूंनी जीन्स, त्वचेचा रंग, शरीर रचना या गोष्टी लक्षात ठेवते. मन काही प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देत नाही, पण शरीराच्या नेहमी काही गोष्टीं लक्षात राहतात . हेच कारण आहे की समजा,एखाद्याने दररोज 5 मित्रांसोबत हात मिळवला तर आपले शरीर त्या व्यक्तीचा स्पर्श लक्षात ठेवतो. त्याच मित्राने आपल्याला मागून स्पर्श केला तरी आपण त्याला ओळखू शकतो.

 

 आयुष्यातील काही गोष्टी या फक्त तुमच्या?

Sadhguru Relationship Tips

 

View this post on Instagram

 

A post shared by Sadhguru Story (@sadhgurustory)

 

जेव्हा शारीरिक संबंध होतात

सद्गुरूंनी स्पष्ट केले की जेव्हा लैंगिक किंवा कोणत्याही प्रकारचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते, ज्यामध्ये विचार, भावना आणि शरीर यांचा समावेश होतो, तेव्हा शरीराशी मोठ्या प्रमाणात आठवणी जोडल्या जातात. यामुळेच नेहमी असं म्हटलं जातं की हे नातं जितकं साधं आणि स्वच्छ ठेवलं जाईल तितकं ते चांगलं राहते .नात्यात व्यवहार आणू नका त्यामुळे त्रास होईल.

शांतता कधीही मिळणार नाही

प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते की त्याला त्याच्या शरीराचे काय करायचे आहे. जर त्याने बर्‍याच भौतिक आठवणी घेण्याचे ठरवले, तर नंतर त्याच्या आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याला कधीही आनंद आणि शांती मिळणार नाही. त्यामुळे इथे प्रश्न नैतिकतेचा नसून तुम्हाला तुमच्या शरीरासाठी कोणते निर्णय घ्यायचे आहेत याचा आहे. त्यावरच सद्गुरूंनी प्रकाश टाकत एकप्रकारे तरुणाईला अशा शारीरिक संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

 

तुम्हाला (Sadhguru Relationship Tips ) हा ब्लॉग कसा वाटला याबद्दल कंमेंट(Comment) करून सांगा ….

1 thought on “Sadhguru Relationship Tips: लैंगिक जीवनात एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य?”

Leave a Comment