Sania Shoaib Divorce : शोएब-सानियाच्या घटस्फोटाची पुन्हा चर्चा; शोएब मलिकने सोशल मीडियाद्वारे दिले संकेत

Sania Shoaib Divorce : पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांचा घटस्फोट होणार अशी चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे. दोघांच्या घटस्फोटच्या बातम्या गेल्या वर्षी पासून येत आहेत. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 साली प्रेमविवाह केला होता. कुटुंब आणि नातेवाईकांच्या उपस्थित हैदराबाद येथे मध्ये विवाह सोहळा झाला होता. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबद्दल मोठी चर्चा सुरू आहे.

लग्नाच्या वेळी दोघांच्या मोठा उत्साह होता. सध्या त्यांच्या घटस्फोटाला चर्चेला मोठे उधाण आले आहे.  पाकिस्तान मधील एका रियालिटी शो ‘द मिर्झा मलिक शो’ मध्ये दोघे दिसले होते.त्यानंतर या सर्व चर्चेला पूर्णविराम लागला होता. पाकिस्तानमधील या शो मध्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या होत्या, विशेष म्हणजे या शोमध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी कोणत्याही चर्चेला प्रतिसाद दिला नाही.

 

सानिया मिर्झाची फसवणूक(Sania Shoaib Divorce) शोएब मलिक याने केल्याची या आधी बातम्यांमध्ये बोलले जात होते. पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर सोबत शोएब मलिक याचे अफेअर आहे. आयशा आणि शोएब याचे सोशल मीडियावर फोटो  चांगलेच व्हायरल झाले होते. या व्हायरल फोटो बदल अभिनेत्री आयशा म्हणाली होती की, हे एका जाहिरातीचे फोटो आहेत.

इंस्टाग्राम बायोमध्ये शोएबने बदल केला आहे. त्यामुळेच त्याच्या घटस्फोटाच्या(Sania Shoaib Divorce) चर्चेला मोठे उधाण आले आहे.शोएब मलिकने त्याच्या बायोमध्ये लिहले होते की “@mirzasanar सुपरवूमन चा पती,एक पिता” असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरवातीपासून लिहले होते. आता शोएबने ताच्या इंस्टाग्राम बायो मध्ये  बदल केला आहे. आता मात्र बायोमध्ये त्याच्या “एक पिता” असे नाव ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकण्यात आले आहे.

2010 मध्ये केले होते लग्न:

लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना जवळपास 5 महिने डेट केले होते. त्यानंतर सानिया आणि शोएब मलिकने २०१० मध्ये लग्न केले होते. असे म्हटले जाते की लग्नानंतर 30 ऑक्टोबर 2018 रोजी शोएब आणि सानिया मुलगा इझानचे पालक झाले.

 

शोएब मलिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द:

शोएब मलिकने आतापर्यंत 25 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 123 टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शोएबच्या नावावर 1 हजार 898 धावंची नोंद आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं  7 हजार 423 धावांचा टप्पा गाठलाय. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 2 हजार 435 धावा केल्या आहेत. शोएब 2008 मध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगचा भाग होता. त्यानं IPL च्या सात सामन्यात 52 धावा केल्या होत्या.

1 thought on “Sania Shoaib Divorce : शोएब-सानियाच्या घटस्फोटाची पुन्हा चर्चा; शोएब मलिकने सोशल मीडियाद्वारे दिले संकेत”

Leave a Comment