Seema Haider Movie : सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर बनत असलेल्या ‘कराची टू नोएडा’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज आणि पहिल गाण समोर आलं.

Seema Haider Movie : पाकिस्तान मधून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider)आणि भारतातील सचिन मीना(sachin Meena) यांची चर्चा देशभरामध्ये सुरू आहे. या जोडप्यावर आधारित ‘कराची टू नोएडा’ (Karachi To Noida) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचे आज पहिले पोस्ट निर्मातेने रिलीज केले आहे. याशिवाय लगेचच ‘कराची टू नोएडा’ चित्रपटांमधील पहिला गाणं तयार करण्यात आले आहे. जे आता दोन दिवसांनी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार आहे.

‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे निर्माता अमित जानी(Amit Jani) हे सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेम कथा पडद्यावर दाखवणार आहेत. या चित्रपटामध्ये फरहीन पालक ही सीमा हैदर ची भूमिका स्वीकारणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक भरत सिंह आहेत. या चित्रपटाचे पहिले गाणे 20 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. असे स्वतः निर्माता अमित जानी यांनी ट्विटर वर ट्विट करून सांगितले आहे.

 

‘कराची टू नोएडा’ चित्रपटातील पहिले गाण्याचे बोल चल पडे हैं हम हे… हे थीम सॉंग गायिका प्रीती सरोज यांनी गायले असून अमित जानी यांनी स्वतः या चित्रपटा मधील गीत लिहिली आहेत. आणि हा चित्रपट जानी फायरफॉक्स च्या बॅनर खाली बनवला जात आहे.

फरहीन पालक ‘कराची टू नोएडा'(Seema Haider Movie) या चित्रपटामध्ये सीमा हैदरच्या(Seema Haider Movie) वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे. विशेष या मध्ये सीमा हैदर चे तीन लूक दाखवण्यात आलेले आहेत. पहिल्या लूक मध्ये ती हिजाब मध्ये दिसत आहे, तर दुसऱ्या लूक मध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या केस मोकळे दिसत आहेत. तिसऱ्या लूक मध्ये सीमा हैदर साडी मध्ये दिसत आहे.डोक्यावर पदर आहे आणि कपाळावर कुंकूही दिसत आहे. या चित्रपटामध्ये भूमिका करणारी फरहीन पालक हिने याआधी चित्रपटामध्ये काम केलेले आहे. तसेच याआधी तिने सलमान खानच्या ‘टायगर जिंदा’ या चित्रपटामध्ये अँकर ची भूमिका केली होती.

सीमा हेदर आणि सचिन मीना यांची खूप अनोखी लवस्टोरी आहे. काही दिवसापासून देशातंच नसून परदेशात देखील चर्चा सुरू आहे. पाकिस्तान मधील कराची येथील सीमा हैदर आणि भारतीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा चा सचिन मीना यांचे मोबाईल वर PUBG गेम खेळत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे जाऊन प्रेमाचे प्रमाण इतके वाढले की, सीमा हैदर यांनी आपले चार मुलं व सर्वकाही घेऊन पाकिस्तान मधून छुप्या पद्धतीने भारतामध्ये सचिन सोबत राहण्यास आली. हे गुपित जेव्हा उघड झाल्यावर सगळीकडे खळबळ उडाली. सीमा आणि सचिन ही कायद्याच्या कचाट्यात अडकवा लागला. पण आता दोघांच्या प्रेमकथेवर चित्रपटही बनत आहे.

 

हेही वाचा

Welcome 3 Release : ‘OMG 2’ नंतर, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, ‘वेलकम 3’ च्या रिलीजची तारीख निश्चित केली

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “Seema Haider Movie : सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर बनत असलेल्या ‘कराची टू नोएडा’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज आणि पहिल गाण समोर आलं.”

Leave a Comment