‘धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास विरोध होता;’ ‘या’ नेत्यांचा मोठा गौप्यस्पोट!

Breaking news राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या महिन्यात उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शिंदे-फडवणीस सरकार मध्ये सामील झाले. अजित पवार आणि त्यांच्यासह आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा चालू झाल्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना फोडून शरद पवार यांनी आपल्या पक्षात घेतले होते , ही चर्चा सुरू होत्या . या चर्चेवर स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाड यांनी मोठा ‘गौप्यस्पोट’ केला.

 

खासदार शरद पवार यांचा भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार धनंजय मुंडे यांना घेण्यास विरोध होता. माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका मुलाखतीत, असा ‘गौप्यस्पोट’ केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे हे भाजप पक्ष सोडणार हे एक वर्षापासून आधी सुरू होतं, पंडित अण्णा मुंडे यांना शरद पवार यांनी हे करायला नको. म्हणून तीन वेळा आधी सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही फोन करून हे सांगितले होते. ‘त्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही घेणार आहेत का, नाही बघा आम्ही दुसऱ्या पक्षात जातो’. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे यांचा पक्षात प्रवेश दिला असा गौप्यस्पोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.

त्यावेळी शरद पवार यांचे मत ‘घर तोडू नका’ असं होतं. पण त्यांनी पवार साहेबांचं ऐकलं नाही,असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शिंदे फडवणीस सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ(9) नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. खासदार शरद पवार यांनीही या अगोदर राजकीय नेत्यांच्या घरात फूट पाडल्याचे आरोप केले जात आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर बोलताना आज जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

2 thoughts on “‘धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास विरोध होता;’ ‘या’ नेत्यांचा मोठा गौप्यस्पोट!”

Leave a Comment