Smriti Mandhana Relationships : स्मृती मंधाना रिलेशनशीपमध्ये ? राजपाल यादवच्या त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

Smriti Mandhana Relationships boyfriend : भारतीय महला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृी मंधाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. स्मृती मंधानाचे नाव बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याच्यासोबत जोडले जात आहे. अभिनेता राजपाल यादव याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चर्चेला उधाण आलेय. सांगलीमध्ये राजपाल यादव चित्रपटाच्या शुटिंगसाठी आलेला होता, त्यावेळी काढलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोनंतर स्मृती आणि पलाश यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. याआधीही या जोडीची चर्चा रंगली होती.

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं खूप जुनं आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, केएल राहुल-आथिया शेट्टी, हेझल किच आणि युवराज सिंग यासारख्या नावांचा समावेश आहे. यामध्ये आता स्मृती आणि पलाश मुच्छल यांचं नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.  पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) हिचा भाऊ आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

 

 

स्मृी मंधानाला ‘नॅशनल क्रश’ (National Crush) म्हणून ओळखले जाते. सध्या स्मृती इंग्लंडमध्ये सुट्ट्याचा आनंद घेत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याला स्मृती आणि पलाश यांनी फोटो पोस्ट केले आहेत. दोघांनी आपपाल्या सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट केले आहेत. पण एकाचवेळी हे फोटो पोस्ट केल्यामुळे यांच्यामधील नात्याची चर्चा रंगली आहे.

यापूर्वी या जोडीच्या नात्याविषयीच्या चर्चा रंगली होती. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नव्हते. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकमेंकाच्या वाढदिवसाला शुभेच्छाही सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्याच. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याने या नात्यावर शिक्कामोर्तब केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजपालने पलाशच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘काम चालू है’ सिनेमाच्या मुहुर्ताचा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्यांच्यासोबत स्मृतीही दिसली होती.  7 जुलै रोजी पलाशने स्मृती मंधानासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरील राजपाल यादव याच्या कमेंटनंतर ते दोघेही एकमेकांना डेट करतायेत,(Smriti Mandhana Relationships)हे समोर आले. राजपालने कमेंट करत लिहिले होते की, “सुंदर जोडपे. देव तुम्हा दोघांना आनंदी ठेवो.”

 

Smriti Mandhana Relationships Boyfriend

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

हे सुद्धा वाचा 

Starly Santos:ज्या देशात जाईल तिथं एक बॉयफ्रेंड; काय आहे या हायली एज्युकेटेड तरुणीचं ‘मिशन बॉयफ्रेंड’?

विशेष म्हणजे, याआधीही पलाश- स्मृती रिलेशनशीपमध्ये (Smriti Mandhana Relationships)असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत कधीच काहीच खुलासा केलेला नाही. एका व्हिडीओमध्ये पलाशच्या हातावर SM18 नावाचा टॅटूही दिसला होता. या टॅटूला चाहत्यांनी स्मृती मानधनाच्या जर्सी नंबरसोबत जोडले होते.

 

 

Leave a Comment