Subhedar Trailer :“अवघ्या 2 दिवसांत…”, ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Subhedar Trailer : तान्हाजी मालुसरे यांचा सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत या ट्रेलरने नवा विक्रम रचला आहे.

स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या अतुलनीयशौर्याने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा अनेकशूरवीर योध्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीयांना प्रेरित केले आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. ‘आधीलगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनीलिहिले गेले आहे. हाच सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे.

 

Subhedar Trailer:

 

ट्रेलरला अवघ्या दोन दिवसांत 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मराठी भाषेत अशी कामगिरी करणारा आणि ट्रेलरला(Subhedar Trailer) वेगाने 2 मिलियन व्ह्यू मिळवणारा ‘सुभेदार’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यासंदर्भात अभिनेता चिन्मय मांडलेकरने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

 

 

चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने “मराठीतले सगळे रेकॉर्ड मोडणार आता… जय शिवराय” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आणखी एका युजरने, “जय भवानी ट्रेलर खूप सुंदर झाला आहे.” अशी कमेंट या पोस्टवर केली आहे. दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीमशौर्याची गाथा उलगडणारा ‘सुभेदार’ चित्रपट १८ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

2 thoughts on “Subhedar Trailer :“अवघ्या 2 दिवसांत…”, ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत”

Leave a Comment