Sunny Leone | सनी लिओनीच्या या कृत्यामुळे तिच्या आईलाच लागलेले दारुचे व्यसन, अभिनेत्रीने स्वतः सांगितलं

Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करताना दिसते. आता अलीकडेच सनीने सांगितले की तिच्या आईला तिच्या अडल्ट करिअरमुळे दारूचे व्यसन लागले होते.

सनीने लिओनी तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल सांगितले

सनी लिओनीने अलीकडेच तिच्या आईच्या दारूच्या व्यसनाबद्दल आणि प्रौढ चित्रपट करण्याचा तिचा निर्णय कसा ‘ट्रिगर’ झाला याबद्दल सांगितले. कॅनडात भारतीय शीख कुटुंबात करनजीत कौर वोहरा म्हणून जन्मलेल्या सनीने तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध प्रौढ उद्योगात सामील होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री पुढे म्हणाली की तिची व्यवसायाची निवड तिच्या आईला आवडली नाही. सनीच्या या निर्णया आईला दारूचे व्यसन जडले. यामुळे २००८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सनी भारतात येऊन बिग बॉस सीझन ५ मध्ये सहभागी होण्याच्या खूप आधी, ही घटना तिच्या आईसोबत घडली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

सनीने कारणही सांगितले

सनीने मुलाखतीत पुढे सांगितले की, ‘माझ्या आईच्या दारूच्या व्यसनाचे कारण म्हणजे अडल्ट उद्योगात माझी एण्ट्री होती. माझ्या कुटुंबातील कोणालाच मी हे काम करावे असे वाटत नव्हते, पण मी स्वत:च्या इच्छेने निवड केली आणि या उद्योगात येण्याचा निर्णय घेतला. माझ्यामुळे आईला या सगळ्यातून जावं लागलं याची खंत आजही आहे. मात्र, मला तेव्हा काही फरक पडला नाही, पण आज मला त्याचा खूप पश्चाताप होत आहे.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

हे सुद्धा वाचा..

Shweta Tiwari | उफ्फ तेरी अदा! काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता तिवारी हिचा जलवा, 42 व्या वर्षातही जबरदस्त…

याचा नेहमीच पश्चाताप होईल, असे सनी म्हणाली

सनी पुढे म्हणाली, ‘हे एक व्यसन होते. हे मानसिकदृष्ट्या काहीतरी होते जे आतून सुधारणे आवश्यक होते. यात माझा किंवा माझ्या भावाचा किंवा माझ्या वडिलांचा काहीही संबंध नाही.’

 

Leave a Comment