Gaddar: प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Braking : तेलंगणा मधील प्रसिद्ध गायक विशेष म्हणजे क्रांतिकारी गीतकार ‘गदर ‘(Gaddar) म्हणून सर्वदूर आपली ओळख निर्माण करणारे गीतकार आज त्याच्या वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे.

 

वास्तवीक म्हणजे त्यांचे खरे नाव गुम्मडी विठ्ठल राव असे आहे. सर्वदूर त्यांची ओळख ‘गदर ‘ म्हणून ओळख होती. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आज(रविवारी) अखेरचा श्वास घेतला. दरम्यान,ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) 1980 च्या कालखंडात सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांनी गदर संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रख्यात कवी गदर (Gaddar) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून ट्विट करत म्हटलं आहे की’ तेलंगणातील प्रख्यात कवी गीतकार आणि कार्यकर्ते श्री गुम्मडी विठ्ठल राव… यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. तेलंगणातील लोकांच्या प्रेमामुळे त्यांना अथक परिश्रम आणि लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा वारसा आम्हा  सर्वांना सतत आदर्श देत राहील.

 

तेलंगणा मध्ये राहुल गांधींनी केलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत गद्दार उपस्थित होते.त्यांना केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपाचे अध्यक्ष जी किशन रेड्डी, टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू आणि इतर अनेक नेत्यांनी गदर (Gaddar) यांचा बद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

 

JOIN WHATSAPP GROUP  , FOLLOW INSTAGRAM ,FOLLOW TWITTER   ,FOLLOW FACEBOOK

Leave a Comment