Dream Girl 2 | ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण चक्क आयुष्मान खुराना हा…

Dream Girl 2 :ड्रीम गर्ल 2 या चित्रपटाची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. या चित्रपटाची (Movie) चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही नक्कीच आहे. ड्रीम गर्ल 1 ने यापूर्वी धमाका केला आहे. यामुळेच चाहत्यांना या देखील चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) हा चित्रपट 25  ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी हा चित्रपट धमाका करेल असे सांगितले जातंय. ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना हा मुख्य भूमिकेत आहे. ड्रीम गर्ल 1 मध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurranaयाच्या अभिनयाचे काैतुक करण्यात आले. ड्रीम गर्ल 1 च्या जबरदस्त यशानंतर लगेचच ड्रीम गर्ल 2 ची तयारी निर्मात्यांकडून सुरू करण्यात आली.

 

ड्रीम गर्ल 2 मध्ये अत्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनन्या पांडे ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार असल्याचे कळाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. कारण ड्रीम गर्ल 1 मध्ये लोकांना नुसरत भरूचा ही मुख्य भूमिकेत होती.

नुसरत भरूचा हिचा ड्रीम गर्ल 2(Dream Girl  2) मध्ये पत्ता कट करण्यात आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा झटका हा बसला होता. यानंतर अनेकांनी चित्रपट निर्मात्यांना टार्गेट करत थेट म्हटले होते की, इथे तरी नेपोटिझम सोडा यार…आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटाबद्दलचे एक अत्यंत मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहे. याचे आता नुकताच नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

ड्रीम गर्ल 2 (Dream Girl  2) चे जे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे ते आयुष्मान खुराना याचे आहे. या पोस्टरमध्ये आयुष्मान खुराना हा अत्यंत वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. आयुष्मान खुराना याचा हा लूक पाहून चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. आयुष्मान खुराना याचा हा नवीन लूक पाहून चाहते चित्रपटाची प्रतिक्षा करताना दिसत आहेत. आता ड्रीम गर्ल 2 चे पोस्टर सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

ड्रीम गर्ल 2 चित्रपटाची निर्मिती एकता कपूर हिने केलीये. जसेही ड्रीम गर्ल 2 चे हे नवीन पोस्टर रिलीज झाले, तेंव्हापासून नुसरत भरूचा हिचे चाहते चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करताना दिसत आहेत. कारण अनन्या पांडे हिच्यासाठी नुसरत भरूचा हिला ड्रीम गर्ल 2 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. ड्रीम गर्ल 1 मध्ये लोकांना आयुष्मान आणि नुसरत भरूचाची जोडी आवडली होती.

1 thought on “Dream Girl 2 | ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण चक्क आयुष्मान खुराना हा…”

Leave a Comment