“राष्ट्रवादीत दोन गट नाहीत” , वादही नाहीत…! शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला थेट उत्तर

Breaking News : महाराष्ट्रात एक महिन्याच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या सत्तेच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. यामध्ये अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाला आणि शरद पवार गट विरोधी बाकावर राहिला. अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे. दरम्यान अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हासह सरकारमध्ये सामील झाल्याचे दावा केला होता.

 

इतकेच नाही तर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्षपदाची निवड केल्याची म्हटले होते. अजित पवारांच्या पत्रानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पत्र पाठवून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्या पत्रास शरद पवार गटाने निवडणूक आयोगास उत्तर पाठवले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर अजित पवार यांनी दावा केलेला अकाली आणि दुर्दैवी आहे. ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळवी. असे शरद पवार गटांनी सांगितले आहे.

यामध्ये अजित पवार गटाच्या विरोधात शरद पवार गटाने तर्क लढवला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे कोणताही पुरावा नाही. अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षांमधील कुठलाही वाद सिद्ध करण्यासाठी प्राथमिकदृष्ट्या सक्षम नाहीत. यावर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षांमधील अजित पवार गटांचा वाद असल्याचे सिद्ध केले आहे. 1 जुलै 2023 च्यापूर्वी अजित पवार गटाने शरद पवार किंवा राष्ट्रवादी पक्ष विरोधात कुठलीही तक्रार दिली नव्हती. त्याचबरोबर शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील नेत्यांनी कुठल्याही बैठकीला विरोध केला नव्हता असा युक्तिवाद शरद पवार गटाने मांडला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने प्रमाणे अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात आला आहे. कारण पक्षांमधील बहुतांश आमदार अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने निवडणूक आयोगास पत्र पाठवले होते. त्यामध्ये अजित पवार गटाने सांगितले होते की, 30 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड केली. त्यावर पक्षातील सदस्यांच्या बहुमतद्वारे स्वाक्षरी केल्या आहेत.

दोन्ही गटात समझोता होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांचे निकटवर्तीय राहिलेले प्रफुल पटेल यांनी अनेकदा मीडियासमोर सांगितले की, आमच्या पक्षांमधील अंतर्गत वादावर भाष्य करणार नाही असं म्हटलं जातं. शरद पवार हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी आमचा निर्णय मान्य करून आम्हाला आशीर्वाद द्यावेत. या मागणीसाठी अजित पवार सह सर्व नेते यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यामुळे दोन्ही गटात भविष्यात समझोता होणार की नाही. हे पाहणे गरजेचे आहे.

 

 

JOIN WHATSAPP GROUP  , FOLLOW INSTAGRAM ,FOLLOW TWITTER   ,FOLLOW FACEBOOK

 

2 thoughts on ““राष्ट्रवादीत दोन गट नाहीत” , वादही नाहीत…! शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला थेट उत्तर”

Leave a Comment