World Richest Man : जगातील श्रीमंताची संपत्ती घटली, टॉप 10 मधून अंबानी बाहेर,अदानींनाही तोटा

World Richest Man : जगातील अव्वल श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली आहे. यामध्ये टेस्लाचे एलोन मस्क ते भारताचे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा समावेश आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील टॉप 20 श्रीमंतांमध्ये 15 श्रीमंत लोकांच्या संपत्तीत घट झाली आहे. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. टेस्ला समभागांच्या घसरणीमुळे, एलोन मस्कची एकूण संपत्ती $ 6.41 अब्ज (सुमारे 54,206 कोटी रुपये) कमी झाली आहे.

इथे भारतातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या घसरणीमुळे मुकेश अंबानींनाही तोटा सहन करावा लागला आहे. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग ०.९८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. त्यामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती ९१ अब्ज डॉलरवर आली आहे. नेट वर्थमधील या घसरणीनंतर मुकेश अंबानी हे श्रीमंतांच्या टॉप 10 यादीतून बाहेर पडले आहेत.

गौतम अदानी यांचेही नुकसान झाले 

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीतही $668 दशलक्षची घट झाली आहे. या घसरणीनंतर गौतम अदानी अव्वल श्रीमंतांच्या यादीत 19 व्या स्थानावर पोहोचले आहेत. सोमवारी त्यांच्या एकूण संपत्तीत $668 दशलक्षची घट झाल्यानंतर, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $65.2 अब्जवर आली आहे. गौतम अदानी यांना या वर्षात आतापर्यंत एकूण $55.3 बिलियनचे नुकसान झाले आहे. टॉप 5 मध्ये एकही भारतीय नाही

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या यादीनुसार,एलोन मस्कच्या एकूण संपत्तीमध्ये प्रचंड घट होऊनही, एलोन मस्क अव्वल स्थानावर (World Richest Man )आहेत. बर्नार्ड अर्नोल्ड 172 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस 164 अब्ज डॉलर्ससह तिसर्‍या क्रमांकावर असून बिल गेट्स 128 अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. लॅरी एलिसन 128 अब्ज डॉलरसह पाचव्या क्रमांकावर आहेत.या यादीनुसार, टॉप 5 मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही, तर टॉप 10 मध्ये एकही स्थान नाही. याआधी मुकेश अंबानी यांचा टॉप 10 मध्ये समावेश होता. सोमवारी घसरणीनंतर मुकेश अंबानी टॉप 10 च्या यादीतून बाहेर पडले आहेत.(Wealth of the world’s richest decreased, Ambani out of top 10, Adani also lost)

 

हेही वाचा 

World Richest Man | जगातील श्रीमंत लोक इंटरनेट कसे वापरतात? हे जाणून आश्चर्यचकित व्हाल!

Leave a Comment