बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाले आहे.

मलायका हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुनच्या  आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाली

 ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला आहे.

रंगलेल्या चर्चांवर कुशा कपिला हिने मौन सोडलं आहे

अर्जुन कपूर याच्या नावसोबत आपल्या नावाची चर्चा होत असल्यामुळे कुशा कपिला म्हणाली

माझ्याबद्दल साध्या जी काही बेताल बडबड सुरु आहे, ती आधी बंद करा.

या सर्व रंगणाऱ्या चर्चा माझ्या आईपर्यंत पोहोचता कामा नये

असं म्हणत कुशा कपिला हिने चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अर्जुन याच्यासोबत मलायका नसल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला.

आता यावर दोघांपैकी एकानेही वक्तव्य केलेलं नाही ज्यामुळे ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत आहेत