Welcome 3 Release : ‘OMG 2’ नंतर, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, ‘वेलकम 3’ च्या रिलीजची तारीख निश्चित केली

Welcome 3 Release: फिरोज नाडियादवाल्यांनी निर्मित केलेल्या ‘वेलकम’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता, त्यात अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल आणि इतर अनेक प्रमुख कलाकार होते. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. नंतर, २०१५ मध्ये निर्मात्यांनी त्याच्या दुसरा भाग, ‘वेलकम बॅक’ च्या रूपात आणला. त्यावेळेस ‘वेलकम ३’ च्या चित्रपटाची उत्सुकता लागलेली होती.

वेलकम 3 बाबत अर्शद वारसीची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी समोर आली होती. वेलकम 3 वर काम सुरू असून, तो या चित्रपटाचा एक भाग असल्याचे त्याने सांगितले. त्याच्यासोबत अक्षय कुमार आणि संजय दत्त देखील या चित्रपटाचा भाग आहेत. त्याच वेळी, रिलीजची(Welcome 3 Release) तारीख देखील समोर आली आहे. याआधी दोन्ही भागांचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते, पण वेलकम टू द जंगलच्या दिग्दर्शनाची कमान अहमद खान सांभाळू शकतात, असे अहवालात सांगितले जात आहे.

वेलकम 3 ची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर नसून यावेळी संजय दत्त आणि अर्शद वारसी दिसणार असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. त्याचबरोबर या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांना एक वर्षाहून अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे. ख्रिसमस 2024 च्या मुहूर्तावर मेकर्स वेलकम 3 रिलीज(Welcome 3 Release) करतील. वेलकम 3 वेलकम टू द जंगल या शीर्षकासह रिलीज होणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात कतरिना कैफ आणि दुसऱ्या भागात श्रुती हसन मुख्य भूमिकेत होती. आता यावेळी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत कोण दिसणार हे पाहावे लागेल. अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही. मात्र, वेलकम टू द जंगलपूर्वी अक्षय कुमार आणि संजय दत्त हेरा फेरी 3 मध्येही एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

 

हेही वाचा 

Akshay Kumar Indian Citizenship: कॅनडा कुमार म्हणून हिणवणाऱ्यांची बोलती बंद! अक्षय कुमारने मिळवलं भारताचं नागरिकत्व

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “Welcome 3 Release : ‘OMG 2’ नंतर, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, ‘वेलकम 3’ च्या रिलीजची तारीख निश्चित केली”

Leave a Comment