चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? चांद्रयान-3 आणि लुना-25 गाठणार ‘दक्षिण ध्रुव

भारताचा चंद्रयान 3 आणि रशियाचे लुना 25 दोन दिवसाच्या अंतराने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? चंद्राच्या दक्षिण ध्रुवा (south Pole) जवळ असं काय आहे की, भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचं आहे पुढे पाहूयात आजच्या लेखामध्ये….

 

भारत आणि रशियात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरू पाहत आहेत. असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा अमेरिकेची अंतराळ संस्थां नासा  सुद्धा 2025 पर्यंत आर्टेमिस (NASA Artemis) मोहिमेअंतर्गत दक्षिण ध्रुवीय भागात अंतराळवीर उतरवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि चीनही इथे आपले यान पाठवण्याची तयारी करतोय. पण हे सगळे देश अचानक चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात एवढा रस का घेताय?

चंद्राच्या विषुववृत्तीय परदेशात मोहीम

चंद्रावर यशस्वी रित्या लँड करणारा पहिला यान म्हणजे 1959 साली रशियाचा लुना 2 यानंतर दशकभरा नंतर अमेरिकेच्या अपोलो 11 मोहीम मध्ये मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. यादरम्यान, आणि तेव्हापासून आजवर अमेरिका रशिया चीन सह काही देशांनी अनेकदा चंद्र मोहिमा हाती घेतल्या आहेत त्यात काहींना यश आलं काहींना अपयश आलं. पण यापैकी बहुतांश चंद्र मोहिमांमध्ये यान चंद्राच्या विषुववृत्तीय म्हणजे इक्वेटोरियल प्रदेशात उतरवण्यात आली आहेत. मग ते नासाचा अपोलो मिशन असो किंवा रशियाच्या लुना मोहिमा हा चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश कोरडा आहे. तिथल्या पृष्ठभागावर पाणी अजिबात नाही हे आजवरच्या संशोधनांमधून स्पष्ट झालंय. ही सगळी याना चंद्राच्या इक्विटोरियल भागात उतरली होती कारण तिथे यांना उतरवणं तुलनेने सोपा आहे आणि सोयीचं ही मानलं जातं. तसेच या भागात सूर्यप्रकाश जास्त काळ उपलब्ध असतो जो या यानांना काम करण्यासाठी गरजेचा असतो. पण मग हा विषुववृत्तीय प्रदेश इतका सोयीचा आहे तर भारत रशिया आणि इतर देश सगळे दक्षिण ध्रुवावर का जाऊ पाहतायात?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय दडलय?

चंद्राचं अक्ष सूर्याच्या जवळपास काटकोनात म्हणजे केवळ दीड अंशांनी कलेला आहे. परिणामी चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश पोहोचला तरीही तिथल्या खोल विवराच्या तळाशी तो पोहोचू शकत नाही. अशा विवरणस कायमचे अंधारातले प्रदेश अर्थात (Permanetly Shadowed regions) म्हणून ओळखलं जातं.आणि त्यांचं तापमान कायमचं अतिशय थंड म्हणजे उणे 230 डिग्रीपर्यंत वगैरे राहिलाय. म्हणून अशा विवरामध्ये यान उतरवण्यात किंवा कुठलेही प्रयोग करताना अनेक अडथळे येऊ शकतात.

चंद्राचा भौगोलिक दक्षिण ध्रुव शॅकल्टन नावाच्या विवरात आहे. या शॅकल्टन विवरात चंद्रयान-1 या यानाने मून इम्पॅक्ट प्रोब हे नियंत्रित पणे आढळलं होतं. त्यावेळी त्या प्रोब मधल्या उपकरणांनी चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात पाण्याचे कण असल्याचे पुरावे जगाला दिले होते आणि चंद्रावर पाणी असू शकतं हे स्पष्ट झालं होतं. चंद्रयान 2 मोहिमे दरम्यान विक्रम लँडर ही याच दक्षिण ध्रुवीय प्रदेशात लांड होणार होतं. पण अखेरच्या क्षणी तो प्रयत्न फसला होता.

आता चंद्रयान-3 ने 17 ऑगस्ट 2023 रोजी टिपलेल्या एका व्हिडिओत चंद्रावरची हीच विवरण स्पष्टपणे दिसतात. आता चंद्रयान 3 चे लँडर याच दक्षिण ध्रुवीय भागात अलगद सोडण्याचा इस्रोचा बेत आहे. हे लँडर उतरवल्यानंतर तिथल्या मातीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न हे लँडर करणार आहे. या गोठलेल्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यमाला पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीची रहस्य दडलेली असू शकतात. कारण सूर्यप्रकाशापासून दूर अशा इथल्या मातीत इतक्या कोटी वर्षांमध्ये कुठलेच मोठे बदल झालेले नसल्याची शक्यता आहे. जवळपास 2 अब्ज वर्ष अंधारात आणि थंड वातावरणात असलेल्या इथल्या मातीमध्ये बर्फाचे रेणू सापडतात का याचा तपास चंद्रयान तीन करेल.

जर इथे पाण्याचा अंश खरंच सापडला तर त्याचा भविष्यातल्या मोहिमांना मोठा फायदा होऊ शकतो. कारण या पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन ची निर्मिती करता येणे शक्य आहे. त्यामुळे चंद्रावर मानव जास्त काळ राहू शकतो का याचे उत्तर मिळेल. शिवाय हाड्रोजनचा वापर इंधन म्हणून वापर चंद्रा पलीकडच्या मोहिमांसाठी करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? | what if the south pole of the moon

याशिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सिलिकॉन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, मॅगनीज आणि टायटेनियम सारख्या खजिनाचे मोठे मोठे साठे सापडतील अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. त्यामुळे या दक्षिण ध्रुवा विषयी जितकं कुतूहल आहे तितकीच शास्त्रज्ञांना आशा सुद्धा आहे.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्र आणि मैत्रिणीस शेअर करा.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? चांद्रयान-3 आणि लुना-25 गाठणार ‘दक्षिण ध्रुव”

Leave a Comment