World Lion Day 2023 |10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस का साजरा केला जातो.

World Lion Day 2023 : सिंहांच्या संवर्धनासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात दरवर्षी 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस साजरा करण्यात येतो.  सिहांचे संवर्धन करण्यासाठी आणि घटती संख्या पाहून जगातील सर्व देशाने पुढाकार घेऊन जागतिक सिंह दिनाची सुरुवात 2013 साली करण्यात आली.

 

भारतात हि सिंहचीं संख्या खूप कमी झाली आहे. भारतात सिंह कुठे बघायला मिळतील? असा प्रश्न विचारला तर फक्त आता भारतामध्ये गुजरातमधील गीरचे जंगल मध्येच सिंह पाहायला मिळणार आहे.आशियाई सिंहांचे भविष्यात रक्षण करण्यासाठी सिंहांना ‘दुसरे घर’ उपलब्ध करण्याची गरज सातत्याने असल्यामुळे या क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

World Lion Day 2023

 

भारतामध्ये केवळ एकाच ठिकाणी आफ्रिकन सिंहांसाठी मोठा भूप्रदेश गिर जंगल मध्ये उपलब्ध आहे. एकाच ठिकाणी सिंह असल्यामुळे एकदा रोग आल्यास तो झपाट्याने पसरून सिंहांची मोठी संख्याच धोक्यात येण्याची शक्यता आहे.असा प्रकार टांझानियातील सेरेंगटीमध्ये असे घडले होते.त्यामुळे सिंहांकरिता ‘दुसरे घर’ निर्माण केले पाहिजे.मात्र त्यासाठी पुरेशा प्रयत्न होत नाही.अशी खंत डॉ. खुदसर यांनी मटा टाइम्स शी बोलताना व्यक्त केली.

 

दिल्ली येथील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. फैयाज अहमद खुदसर यांनी खंत व्यक्त केली आहे कि, केवळ एकाच भूप्रदेशात एखाद्या प्राणिप्रजातीला मर्यादित ठेवल्यास त्याचे विविध दुष्परिणाम होतात.त्यामुळे, विस्तृत भूप्रदेश उपलब्ध करून देण्यासाठी देशाच्या इतर भागात सिंहांसाठी ‘दुसरे घर’ निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत

 

सिंहांचे अस्तित्व उत्तर भारतात होते

एकोणविसाव्या शतकात आशियाई सिंहांचे अस्तित्व केवळ गुजरातमध्ये नव्हे तर उत्तर-पश्चिम भारतातील विविध प्रदेशात नोंदविण्यात आले होते. किंबहुना, मध्य आशियातील पॅलेस्टाइनपासून ते पूर्व भारतातील पलामूपर्यंत सिंह आढळत असे. हरयाणा (१८३४), आबू (१८७२), अहमदाबाद (१८३६), बडोदा (१८३२), रेवा (१८६०), ग्वाल्हेर (१८६५), गुणा (१८७२) आणि पलामू (१८१४) या आणि इतर ठिकाणी सिंहांच्या अस्तित्वाच्या नोंदी आढळल्या आहेत.

world Lion Day 2023

भारतात चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी, नामिबियातून चित्ते मध्य प्रदेशातील ‘कुनो राष्ट्रीय उद्यानात’ आणले गेले आहेत. मात्र, चित्यांआधी या जंगलात सिंहांचा अधिवास रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कुनोतील परिस्थिती ही सिंहांसाठी पोषक आहे आणि तेथे ऐतिहासिकदृष्ट्या सिंहाचे वास्तव्यही होते. त्यामुळे मागील दशकात येथे सिंहांना रुळविण्याच्या दृष्टीने प्राथमिक प्रयत्न आणि अभ्यासही करण्यात आला होता.

 

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update