Whatsapp New Feature | WhatsApp आणत आहे खास फीचर; आता टेक्स्ट मेसेजचा रिप्लाय ‘द्या’ व्हिडीओ मेसेजने

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्स मेसेजिंग फीचर असल्याने कंपनीही कायम नवनवीन फीचर युजर्ससाठी आणत असते. आताही कंपनीने एक नवीन फीचर आणले आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही टेक्स्ट मेसेजलाही रिप्लाय देताना एक शॉर्ट व्हिडिओ पाठवण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी, वापरकर्ते कोणत्याही मेसेजसला त्वरित ऑडिओ किंवा टेक्स्ट संदेशाद्वारे उत्तर देऊ शकत होतात. पण आता छोट्या व्हिडिओंच्या माध्यमातूनही उत्तर देऊ शकणार आहेत. यावेळी ६० सेकंदापर्यंत म्हणजेच १ मिनिटापर्यंतचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. कंपनीचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ देखील संदेशाप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. हे फीचर जागतिक स्तरावर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. चलातर या फीचरबद्दल आणखी जाणून घेऊ.

 

Whatsapp New Feature | व्हॉट्सअ‍ॅपपचे नवीन फीचर

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या फीचरची घोषणा केली. हे फीचर कसे काम करेल हे सांगणारा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला. व्हॉट्सअ‍ॅपप वापरकर्ते ज्या पद्धतीने व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करतात, त्याच पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. मजकूर बॉक्सच्या पुढे एक व्हिडिओ रेकॉर्डर चिन्ह दिले जाईल, ज्यावर क्लिक करून तुम्ही ६० सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

 

Whatsapp New Feature | नवीन फीचरमध्ये काय आहे खास

व्हॉट्सअॅपने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये या नवीन अपडेटबद्दल सांगितले आहे. व्हिडिओ संदेशांचा वापर वाढदिवसाचा संदेश रेकॉर्ड करण्यासाठी, काही चांगली बातमी शेअर करण्यासाठी, इत्यादीसाठी केला जाऊ शकतो. टेक्स्ट बॉक्सच्या पुढे दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून ही सेवा वापरू शकता. डीफॉल्टनुसार, संदेश आवाजाशिवाय प्ले होईल. जर तुम्हाला व्हिडिओचा आवाज हवा असेल तर तुम्हाला व्हिडिओवर टॅप करावे लागेल. दरम्यान टप्प्याटप्प्याने हे फीचर सर्व Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. हे अपडेट मॅन्युअली मिळवण्यासाठी तुम्ही Google Play Store किंवा App Store वर जाऊन WhatsApp ची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करू शकता.

Whatsapp Video Feature

 

 

हे सुद्धा वाचा 

ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडलात तर काय कराल? पैसे मिळवण्यासाठी लगेचच ‘या’ पोर्टलवर तक्रार करा

Leave a Comment