World Elephant Day 2023: ‘जागतिक हत्ती दिन’ कोणत्या उद्देशाने साजरा करण्यात आला हा दिवस घ्या जाणून….

World Elephant Day 2023 : हाथी मेरे साथी .. होय, हत्तींना नेहमीच मानवी साथीदार मानले गेले आहे. आज म्हणजेच 12 ऑगस्ट हा जगभर जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आशियाई आणि आफ्रिकन हत्तींच्या संरक्षकांकडे जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम 12 ऑगस्ट 2012 रोजी साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.हत्ती हा पृथ्वीवर आढळणारा सर्वात मोठा प्राणी आहे.

भारतात हत्तींची शेवटची जनगणना 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी भारतात हत्तींची एकूण संख्या 30 हजार होती, पण जसजसे वर्ष पुढे जात आहे तसतशी ही संख्या कमी होत आहे. ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.हत्ती दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील हत्तींबद्दल जागरूकता आणि संरक्षणाचा प्रचार करणे हा आहे.भारताचा वन्यजीव संरक्षण कायदा मध्ये हत्तीला सर्वोच्च दर्जा दिला आहे.

 

जागतिक हत्ती दिन साजरा करण्याचा उद्देश :

‘जागतिक हत्ती दिन’ करण्याचा उद्देश हत्तींची नाहीशी होत चाललेली संख्या, त्याची कारणे याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा आहे. यासोबतच त्यांचे संवर्धन, पुनर्वसन, उत्तम आरोग्य याविषयी त्यांना जागरुक करून अवैध तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करणे.

आशियायी बाजारामध्ये हस्तिदंत याची खूप मोठी मागणी असल्यामुळे या प्राण्यांची खूप मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते हस्तिदंतची किंमत खूप मोठी असल्यामुळे त्यांची शिकार केली जाते. त्यामुळे  हत्तीचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस “वर्ल्ड एलिफंट डे” (World Elephant Day 2023)म्हणून साजरा केला जातो.

World Elephant Day 2023   Marathi

हत्ती का महत्त्वाचे आहेत?

  • हत्ती कळपात चालतात, जे घनदाट जंगलात मार्ग काढतात, जे इतर प्राण्यांसाठी खूप उपयुक्त आहे.
  • हत्ती हा जगासाठी अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. हत्ती जंगलात राहणाऱ्या इतर वन्यजीवांसाठी इको सिस्टम राखण्यात मदत करतात.
  •  सध्या देशातील 14 राज्यांमध्ये सुमारे 65.000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या हत्तींसाठी 30 संरक्षित वनक्षेत्रे आहेत. आशियाई हत्तींच्या जागतिक संख्येच्या ६० टक्क्यांहून अधिक संख्या भारतात आहे.मात्र अलीकडच्या काळात हत्तींच्या संरक्षणासाठी वनविभाग, अशासकीय संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्रितपणे त्यांच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवणे गरजेचे आहे.

 

हत्तींशी संबंधित काही  मनोरंजक तथ्ये :

  • आफ्रिकन आणि आशियाई हत्तींना फक्त त्यांचे कान पाहून ओळखू शकता. आफ्रिकन हत्तींचे कान खूप मोठे आहेत आणि आशियाई हत्तींचे कान त्यांच्यापेक्षा लहान आहेत.
  • जर आपण वजनाबद्दल बोललो तर हत्तीचे वजन 5 हजार किलोपर्यंत असू शकते.
  • हत्तींना चिखलात लोळायला आवडते.
  • हत्ती एका दिवसात १५० किलो अन्न खातो.
  • हत्तीचे बाळ जन्मानंतर २० मिनिटांनीच उभे राहते.
  • हत्ती एका वेळी ३०० लिटर पाणी पिऊ शकतो.

 

हेही वाचा

जागतिक सिंह दिवस का साजरा केला जातो.

World Elephant Day 2023 :

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

2 thoughts on “World Elephant Day 2023: ‘जागतिक हत्ती दिन’ कोणत्या उद्देशाने साजरा करण्यात आला हा दिवस घ्या जाणून….”

Leave a Comment