World Mosquito Day 2023 : डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत; जाणून घ्या डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी काय करावे

World Mosquito Day 2023 : दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी ‘जागतिक मच्छर दिवस’ साजरा केला जातो. डासांपासून होणा-या आजारांबाबत लोकांना जागरुकता देणे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी सर्वांना जागरूक करणे.हाच दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांचा समावेश होतो.

1887 रोजी , सर रोनाल्ड रॉस, भारतात कार्यरत लष्करी सर्जन यांनी शोधून काढले की, मलेरिया हा डासांमुळे पसरणारा रोग आहे. रोनाल्डच्या या शोधामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांवर आणि त्यांच्या उपचारांवर प्रकाश पडला. नंतर रोनाल्ड रॉस यांना 1902 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला होता. त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘जागतिक मच्छर दिवस'(World Mosquito Day) दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

सध्याच्या घडामोडीं बद्दल बोलायचे झाले तर, डासांमुळे होणारा एक आजार म्हणजे डेंग्यू झपाट्याने पसरत आहे. डेंग्यू ताप एडिस इजिप्ती या पिवळ्या तापाच्या डासामुळे पसरतो. डेंग्यूमुळे ताप, डोकेदुखी, स्नायू, सांधेदुखी अशा समस्या सुरू होतात. त्यामुळे डोळ्यांत तीव्र वेदना होऊन संपूर्ण शरीर तुटल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत डेंग्यूच्या डासांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असते. आपण येथे जाणून घेऊ की, डेंग्यूचा धोका कसा कमी करता येईल आणि खबरदारी घेऊन डेंग्यूपासून सुरक्षित राहता येईल.

World Mosquito Day 2023
World Mosquito Day 2023 

 

डेंगू पासून सावध राहण्यासाठी या टिप्स

  • डेंग्यू होऊ नये म्हणून सतर्क राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. डेंग्यू हा डास चावल्यामुळे होतो, त्यामुळे शक्य तितके स्वतःला डासांपासून दूर ठेवा. पूर्णपणे कपडे घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून डास तुम्हाला चावणार नाहीत

 

  • तुमच्या घराभोवती आणि घरात पाणी साचू देऊ नका. जिथे जिथे पाणी साचते तिथे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच पावसाळ्यात अनेकांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण होते.

 

  • घरा मधील झाडे स्वच्छ करा, नाले स्वच्छ ठेवा आणि तलावात किंवा बादलीत पाणी राहू देऊ नका. पाण्याच्या भांड्यांवर झाकण ठेवा. कुलर चालवत असाल तर स्वच्छ करत रहा नाहीतर पाणी काढून कुलर चालवा.

 

  • आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. स्वच्छता राखल्यास डासांच्या उत्पत्तीचा धोका कमी असतो.

 

  • डेंग्यूचा फैलाव पावसाळ्यात जास्त होतो, त्यामुळे पावसाळी ठिकाणी न जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही कुठे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर पावसाळ्यात जाण्याऐवजी उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात जा.

 

हेही वाचा 

World Photography Day 2023: आज साजरा केला जातोय ‘जागतिक फोटोग्राफी डे’; आणि पहिला फोटो कोणी काढला होता, वाचा सविस्तर

झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? तुम्ही पण या आजराला बळी पडू शकतात, ही आहेत लक्षणे

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

Leave a Comment