झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? तुम्ही पण या आजराला बळी पडू शकतात, ही आहेत लक्षणे

तुम्हाला पण झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? ही सवय तुम्हाला असेल तर लवकरच म्हणजे आजपासूनच बंद करा. कारण तुम्ही रात्री जास्त पाणी पिल्याने नॉक्टूरिया या आजाराला बळी पडू शकतात. या आजारामध्ये तुम्हाला रात्री अनेक वेळा लघवीस जावे लागते. तुमची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमचे शरीर अनेक प्रकारच्या आजाराला आमंत्रण देऊ शकते. तज्ञ डॉक्टर सांगतात की, ज्या लोकांना रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असते. अशात काही लोकांमध्ये, मूत्राशयात जास्त पाणी जमा होते आणि ते वारंवार हळूहळू बाहेर येते. यामुळे रात्री अनेकवेळा उठून लघवीस जावे लागते.

अनेक वेळा रात्री जास्त पाणी न पिता ही वारंवार लघवीस जावा लागतं. असे मधुमेहामुळे पण होऊ शकते. मात्र ज्यांना मधुमेह किंवा इतर कोणतीही समस्या नाही. परंतु तरीही रात्रीच्या अनेकवेळा लघवी करण्यास जावे लागते. तर हे नॉक्टुरिया रोगाचे लक्षण आहे.

नॉक्टुरिया म्हणजे नेमकं काय? : याबाबत त्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर सांगतात की, रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे, जास्त प्रमाणात प्रोस्टेट वाढवणे आणि मद्यपान करणे यामुळे नॉक्टुरिया होतो. या परिस्थितीमध्ये व्यक्ती रात्री दोन वेळापेक्षा अधिकवेळा लघवी करण्यास जाते. ही समस्या कोणाला जाणवत असेल तर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. नॉक्टुरिया (Nocturia) हा आजार धोकादायक नसला तरी, पण डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे. कारण यामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारण्याचा सल्ला डॉक्टर देतील. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला रात्री झोपण्याच्या 2 तास आधी कोणतेही द्रव्य पदार्थ घेऊ नका असा सल्ला सांगितला जाईल.

 

यामध्ये पुढे तज्ञ डॉक्टर सांगतात की, नॉक्टुरिया आजारामध्ये 50 वय वर्षे ओलांडलेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका जास्त प्रमाणात असतो. सामान्यपणे ही समस्या या वयोगटातील प्रत्येक तीन पुरुषांमध्ये प्रत्येकी एक पुरुष आणि एक स्त्री मध्ये दिसून येतो . यामध्ये काही लोकांना रात्री उठून जास्त वेळेस लघवी करण्यास जावे लागते. तसेच यापैकी काही लोकांमध्ये मधुमेह किंवा इतर मूत्रपिंडाचे आजार असू शकतात. ही समस्या वारंवार होत असल्यास रात्रीची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे शारीरिक आणि चिंताग्रस्त समस्या उद्भवू शकतात. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास जीवनशैलीमध्ये नवीन आजाराला बळी पडू शकतात. त्यामुळे या परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील.

या गोष्टी सावधगिरीने लक्षात ठेवा

  • रात्री अधिक प्रमाणात पाणी आणि दारू पिऊ नका.
  • रात्री उशिरापर्यंत झोपण्याची सवय थांबवा
  • ही समस्या 8 ते 10 दिवसापेक्षा जास्त काळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

 

हेही वाचा 

वारंवार उचकी! थांबायचं नाव घेत नाही? ‘हे’ उपाय करून बघा…

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

Leave a Comment