Sharad Pawar Vs Ajit Pawar : साहेब की दादा? कोणते आमदार कुणाकडे, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar

Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. 40 आमदारांना हाताशी धरून  अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याशिवाय आणखी आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी सरकारमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावरही दावा केला आहे. शिवसेनेच्या बंडाला एक वर्ष झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड सुरु झाला आहे. काका आणि पुतण्याच्या लडाईत कोण बाजी मारणार? हा येणार काळ ठरवेल. पण शरद पवार आणि अजित पवार यांनी आज बैठका घेतल्या होत्या.त्यामध्ये  दोन्ही गटाकडून व्हीप जारी करण्यात आले होते. आमदार कुणाकडे जाणार?? याची चर्चा राज्यभर सुरु होती. अजित पवार यांना आतापर्यंत 32 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर शरद पवार यांच्या पाठिशी 18 आमदारांचे पाठबळ आहे. तर तीन जणांची भूमिका अद्याप अस्पष्ट नाही . पाहूयात कोणते आमदार कुणाकडे आहेत..

अजित पवारांसोबत एमईटीला..

  1. छगन भुजबळ, येवला
  2. धर्मरावबाबा आत्राम, अहेरी
  3. माणिकराव कोकाटे, सिन्नर
  4. मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी मोरगाव
  5. अण्णा बनसोडे, पिंपरी
  6. अजित पवार, बारामती
  7. दिलीप वळसे पाटील, आंबेगाव
  8. संग्राम जगताप, अहमदनगर शहर
  9. दत्ता भरणे, इंदापूर
  10. संजय बनसोडे, उद्गीर
  11. अदिती तटकरे, श्रीवर्धन
  12. नरहरी झिरवळ, दिंडोरी
  13. दिलीप मोहिते, खेड-आळंदी
  14. निलेश लंके, पारनेर
  15. हसन मुश्रीफ, कागल
  16. अनिल पाटील, अंमळनेर
  17. धनंजय मुंडे, परळी
  18. प्रकाश सोळंके, माजलगाव
  19. बाबासाहेब पाटील, अहमदपूर
  20. बाळासाहेब आजबे, आष्टी
  21. सुनिल शेळके, मावळ
  22. अतुल बेनके, जुन्नर
  23. राजू कारेमोरे, तुमसर
  24. दिलीप बनकर, निफाड
  25. नितिन पवार,कळवण
  26. इंद्रनील नाईक, पुसद
  27. शेखर निकम, चिपळूण
  28. सुनिल टिंगरे, वडगाव शेरी
  29. यशवंत माने, मोहोळ
  30. दीपक चव्हाण, फलटण
  31. राजेश पाटील, चंदगड
  32. बबन शिंदेमाढा (हॉस्पिटलला आहेत.)

 

शरद पवारांसोबत वायबी सेंटरला…

  1. किरण लहामाटे, अकोले
  2. अशोक पवार, शिरूर-हवेली
  3. रोहित पवार, कर्जत-जामखेड
  4. चेतन तुपे, हडपसर
  5. अनिल देशमुख, काटोल
  6. राजेंद्र शिंगणे, सिंदखेडराजा
  7. प्राजक्त तनपुरे, राहुरी
  8. जितेंद्र आव्हाड, कळवा मुंब्रा
  9. बाळासाहेब पाटील, कराड उत्तर
  10. जयंत पाटील, इस्लामपूर
  11. सुमन आर आर पाटील, तासगाव-कवठे महांकाळ
  12. संदीप क्षीरसागर, बीड
  13. राजेश टोपे, घनसावंगी
  14. मकरंद पाटील, वाई
  15. सुनिल भुसारा, विक्रमगड
  16. मानसिंग नाईक, शिराळा
  17. दौलत दरोडाशहापूर – आलेले नाहीत (फोनवरुन माहिती)
  18. राजू नवघरेवसमत – आलेले नाहीत (साखर कारखाना कार्यक्रमफोनवरुन पाठिंबा

तळ्यात-मळ्यात (अजून कुठेच नाही)

  1. सरोज अहिरेदेवळाली
  2. नवाब मलिकअणुशक्तीनगर
  3. आशुतोष काळेकोपरगाव

 

5 thoughts on “Sharad Pawar Vs Ajit Pawar : साहेब की दादा? कोणते आमदार कुणाकडे, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर”

Leave a Comment