Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : सोन्याहून पिवळी गुंतवणूक करण्याची संधी; ऑनलाईन खरेदीवर 50 रुपयांची सूट, 15 सप्टेंबरपर्यत गुंतवणूकीची सुवर्णसंधी

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 मध्ये सार्वभौम सुवर्ण बाँड (SGB) योजना जाहीर केली होती.सार्वभौम सुवर्ण बाँड योजना 2023-24 ची दुसरी मालिका (sovereign gold bond scheme 2023-24 series ii in Marathi) सदस्यत्वासाठी 11 सप्टेंबर रोजी उघडेल. यामध्ये तुम्ही 15 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकाल. रिझर्व्ह बँकेने आज यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.आज सोन्याचा प्रतितोळा दर 61000 गेला आहे. त्यामुळे सोने खरेदी म्हटलं की पोटात गोळा येतो.त्यामुळे एका सरकारी योजनेच्या माध्यमातून स्वस्तात सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे.

SGB म्हणजे काय?

एसजीबी (SGB) हे सरकारी प्रतिभूती असून त्याचे मूल्य ग्राम-सोन्यामध्ये असते. प्रत्यक्ष सोने ठेवण्यासाठीचा तो एक पर्याय आहे. निवेशनांना इश्युची किंमत रोख स्वरुपात द्यावी लागते आणि बाँड्स परिपक्व झाल्यावर त्यांचे विमोचनही रोखीनेच दिले जाते. हे रोखे भारत सरकारच्या वतीने रिझर्व बँकेकडून दिले जातात.

यामध्ये गुंतवणूक करायला किती रक्कम लागेल?(Sovereign Gold Bond Scheme 2023-24)

आरबीआयने सार्वभौम गोल्ड बॉण्ड योजनेसाठी 5,923 रुपये/ग्राम रुपये किंमत निश्चित केली आहे . परंतु, तुम्ही डिजिटल मोडद्वारे खरेदी केल्यास, तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देखील मिळेल. म्हणजेच त्याची किंमत तुम्हाला रु 5,873/ग्रामला मिळेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सरकारच्या वतीने सार्वभौम गोल्ड बाँड योजना जारी करते. भौतिक सोन्याला पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. भौतिक सोन्याच्या तुलनेत सार्वभौम गोल्ड बाँड योजनेतील गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते. यामध्ये शुद्धतेबाबत कोणताही धोका नसून व्याजही उपलब्ध आहे. या गुंतवणुकवर दिलेला व्याजदर प्रारंभिक गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 2.50% आहे.

या योजनेचा कालावधी किती आहे?(Sovereign Gold Bond Scheme 2023-24)

सार्वभौम गोल्ड बाँड योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. या योजनेचा कालावधी 8 वर्षांचा आहे. तथापि, 5 व्या वर्षी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारकडून प्रमाणपत्र मिळते. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना देखील डीमॅट स्वरूपात रूपांतरित केली जाऊ शकते. हे कर्जासाठी तारण म्हणून देखील वापरले जाऊ शकते.

कोण आणि किती गुंतवणूक करू शकते?(Sovereign Gold Bond Scheme 2023-24)

कोणताही भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकतो. आता प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती किती गुंतवणूक करू शकते? यामध्ये किमान गुंतवणूक 1 ग्रॅम आहे. तर, एखादी व्यक्ती या योजनेत जास्तीत जास्त 4 किलोपर्यंत गुंतवणूक करू शकते. ट्रस्ट आणि इतर अशा संस्थांसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक 20 किलो आहे.

आपण ते कुठे खरेदी करू शकता? (सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कॅम 2023-२४ )

जर तुम्ही, डिजिटल गुंतवणूक केल्यास त्याचा अधिक फायदा होईल. तुम्ही पोस्ट ऑफिस, बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCIL) आणि स्टॉक एक्सचेंज NSE आणि BSE वरून देखील ते खरेदी करू शकता. यूपीआयद्वारे तुम्ही डिजिटल पद्धतीने पैसे देऊ शकता. तुम्हाला फिजिकल पेमेंट करायचे असल्यास तुम्ही रोख, चेक किंवा ड्राफ्ट देऊ शकता.

हेही वाचा : जर तुम्हाला 1 वर्षानंतर पेन्शन मिळवायचे असेल? तर एलआयसीच्या या योजनामध्ये गुंतवणूक करा

 व्हिडिओ पहा 

What is SGB? & sovereign gold bond scheme 2023-24 series ii in Marathi

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

1 thought on “Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : सोन्याहून पिवळी गुंतवणूक करण्याची संधी; ऑनलाईन खरेदीवर 50 रुपयांची सूट, 15 सप्टेंबरपर्यत गुंतवणूकीची सुवर्णसंधी”

Leave a Comment