Maharashtra Politics Live Updates: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, नाणा पटोले यांचा घणाघाती आरोप

Maharashtra Politics Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदार अजित पवारांच्या मेळाव्यात होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार, 4 खासदार, तीन विधानपरिषदेचे आमदार उपस्थित होते. आता बंडाचं हे लोण इतर राज्यात किती पसरलंय ? पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला किती सदस्य उपस्थित राहणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केला आहे. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच आहे, असा वार नाना पटोले यांनी केला आहे.अजित पवारांना 33 आमदारांनी समर्थन दिले तर शरद पवारांना केवळ 18 आमदारांनी साथ दिली आहे .

त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. शरद पवार आज दिल्लीत आपला पॉवर शो दाखवणार आहे. मात्र, बैठकीआधीच दिल्लीतील बॅनर हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत शरद पवार आपली काय ताकद दाखवतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील बैठकीला देशभरातील राष्ट्रवादीचे नेते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, नाणा पटोले यांचा घणाघाती आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केला आहे. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच आहे, असा वार नाना पटोले यांनी केला आहे. मणिपूरकडे पाहायला भाजपकडे वेळ नाही, मात्र दुसऱ्यांची घरं फोडायला वेळ आहे. असाही हल्लाबोल नाना पटोले यांनी केला .

 

अजून काय पाहिजे? म्हणत रोहित पाटलांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल.

प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली… जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच… pic.twitter.com/wT9js2kcph

— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023

 

रोहित पाटलांचं वळसे पाटलांच्या बंडखोरीवर ट्विट.

मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे… pic.twitter.com/Kg06T3C5Wp

— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023

 

रामदास आठवले आणि अजित पवारांची भेट:

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या.

 

उद्धव ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार राजेंद्र देशमुख शिंदे गटात:

नांदगावचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत राजेंद्र देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. राजेंद्र देशमुख यांनी साथ सोडणे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

 

अजित पवारच राष्ट्रीय अध्यक्ष:

अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अजित पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष संबोधले आहे. अजित पवार गटाच्या 40 हून अधिक समर्थक आमदारांनी प्रतिज्ञापत्र दिल्याची चर्चा आहे.

 

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यावर शरद पवार दिल्लीत..

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यावर बुधवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली. दुपारी 3 वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड दिल्लीला रवाना झाले आहेत. देशातल्या विविध राज्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्या या बैठकीसाठी या बैठकीला आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीद्वारे पवार राष्ट्रवादीची देशपातळीवरील फळी सांभाळण्याची कसरत करणार आहेत. पक्ष आणि चिन्हावरील दावेदारीवरून दोन्ही गट निवडणूक आयोगात पोहोचले आहेत.

 

उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा जाहीर:

उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा जाहीर करण्यात आला आहे. पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. 10 जुलै रोजी नागपुरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.

 

शरद पवार अजित पवारांकडे किती आमदार खासदारांचं पाठबळ?

40 हून अधिक आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांच्याकडे आजच्या घडीला 33 ; तर शरद पवार यांच्याकडे 18 आमदार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. नवाब मलिक आणि सरोज अहिरे या आमदारांनी दोन्ही गटांच्या बैठकांकडे पाठ फिरवून भूमिका उघड केली नाही.

 

छगन भुजबळांनी डागली पवारांवर तोफ:

अजित पवारच पक्षाचे प्रमुख राहतील; शरद पवारांनी भाजपशी चर्चा करून सातत्याने शब्द फिरवला, असा गौप्यस्फोट अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत मध्ये केला.

 

1 thought on “Maharashtra Politics Live Updates: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, नाणा पटोले यांचा घणाघाती आरोप”

Leave a Comment